मुंबई : मुंबई पालिकेवर गेले पंचवीस वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. मात्र शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात माजी नगरसेवकांची उठबस कमी होती. याचा फायदा घेत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेना कार्यालावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न करण्यात ( Shinde Group Try To Claim Thackeray Group Office ) आला. यावरून शिंदे ठाकरे गट आमने सामने आल्याने पालिका आयुक्त व प्रशासक यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व राजकीय पक्षांची कार्यालये सिल केली ( BMC Seal All Political Parties Office ) आहेत.
शिवसेना पक्ष कार्यालयावरून राडा : मुंबई महापालिकेचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपला त्यानंतर पालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले. याच दरम्यान शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी फूट पाडली. कालांतराने एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे पक्ष कार्यालय आहे. या कार्यालयात शिवसेनेचे माजी नगरसेवक फिरकत नव्हते. एखाद्या अपवादत्मक परिस्थितीमध्ये काही माजी नगरसेवक या कार्यालयात येत होते. मात्र काल बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून या कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावरून शिंदे गट आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी माजी नगरसेवक आमने सामने( Shinde Thackeray Group Face each other ) आले. यावेळी घोषणाबाजी ( Slogans From Shinde Group ) झाली. पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला ( political parties offices in BMC ) होता.
राजकिय कार्यालये सिल : काल बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही गटाचे पदाधिकारी पालिकेत आमने-सामने आले. शिंदे गटाचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे गटाचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर माजी नगरसेवक सचिन पडवळ यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली. यादरम्यान पालिकेत पोलिसांनी येऊन यात हस्तक्षेप केला. त्यानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पालिका आयुक्त व प्रशासक इकाबल सिंग चहल यांनी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, समाजवादी अशा सर्वच राजकीय पक्षांची कार्यालये सिल करण्यात आली आहेत. यामुळे आता माजी नगरसेवकांना पालिकेत बसण्याचे हक्काचे ठिकाण बंद झाले आहे.