ETV Bharat / state

Shinde Group Guwahati Tour : शिंदे गटाची गुवाहाटी वारी ठरली, 'या' तारखेला जाणार कामाख्या देवीच्या दर्शनाला - Kamakhya Devi

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटीला कामाख्या देवीच्या (Kamakhya Devi) दर्शनाला जाणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. अखेर आज दौऱ्याची तारीख समोर आली आहे. येत्या 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे नेते (Shinde group decided to go to Guwahati on November 21) कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत. Guwahati Tour of Shinde Group

Guwahati Tour of Shinde Group
शिंदे गटाची गुवाहाटी वारी
author img

By

Published : Nov 15, 2022, 6:24 PM IST

मुंबई : शिवसेनेतून बंड केलेल्या शिंदे सरकारच्या सत्तांतराचा नारळ गुवाहाटीतून फुटला. सत्तेत आल्यानंतर गुवाहाटीला जाण्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती. आता गुवाहाटीला जाण्याची तारीख निश्चित झाली असून; येत्या 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे नेते (Shinde group decided to go to Guwahati on November 21) कामाख्या देवीच्या (Kamakhya Devi) दर्शनाला जाणार आहेत. कामाख्या देवीचे दर्शन झाल्यानंतर एका खास पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्तांतरणाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी जी पूजा केली, त्याच प्रकारची ही खास पूजा असणार असल्याची माहिती आहे. Guwahati Tour of Shinde Group

पूर्वतयारी सुरू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा हा एक दिवसीय हा दौरा आहे. गुवाहटीच्या दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून; सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन, मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन असे सांगितले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहटीचे मुख्यमंत्री, राज्यपाल, पोलीस कमिशनर अशा महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार आहेत. सत्तांतराच्या काळात शिंदे यांना ज्या व्यक्तींनी मदत केली त्यांना ते भेटणार आहेत.

मनोकामना पूर्ण : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षातून बंडखोरी केली आणि तब्बल 40 शिवसेना आमदारांना घेऊन सत्तेबाहेर पडले. त्यांच्यासह मित्रपक्ष आणि अपक्ष आमदारांनी देखील सत्तेतून काढता पाय घेतला होता. हे सर्व आमदार गुवाहाटीच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. शिंदे गटाच्या या सर्व 50 आमदारांचा गुवाहाटी दौरा चांगलाच गाजला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि राज्यात नवं सरकार स्थापन झाल्यानंतरच ते पुन्हा राज्यात आले होते. एकनाथ शिंदेसह आमदारांनी शक्तिपीठ असलेल्या कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि तिथं पूजाही केली होती. कामाख्या देवी ही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते आणि तिचा प्रसाद भक्तांनी इच्छित फळ देतो असं मानलं जातं. त्यावेळी संजय राऊत यांनी कामाख्या देवीच्या दर्शनावरून टीका देखील केली होती. मात्र एकनाथ शिंदेंची मनोकामना पूर्ण झाली, हेही खरे आहे. Guwahati Tour of Shinde Group

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.