मुंबई Shinde Group Dasara Melava : मुंबईच्या आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा झाला. आपल्या भाषणाला सुरुवात करताचं एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. 'आमच्यासाठी मैदान नाही, तर विचार महत्वाचे आहेत. मी बाळासाहेबांचे विचार कधीच सोडले नाही. जिथे बाळासाहेबांचे विचार, तेच आमचं शिवतीर्थ आहे', असं एकनाथ शिंदे म्हणाले.
तुमचं प्रेम फक्त पैशांवर : उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना एकनाथ शिंदे म्हणाले, रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनीच बाळासाहेबांचा गळा घोटला. तुमची बांधिलकी फक्त पैशांसाठी होती. तुम्ही शिवसेनेच्या खात्यातील ५० कोटी रुपये मागितले. मात्र बॅंकेनं तुम्हाला नकार दिला. बॅंक म्हणाली की निवडणूक आयोगानं शिवसेना शिंदेंना दिली. त्यानंतर तुम्ही निर्लज्जपणे आम्हाला पत्र पाठवलं. तुम्ही आमच्यावर ५० खोक्यांचा आरोप करता, मात्र त्यानंतर आम्हालाच ५० कोटी मागता. मी क्षणाचाही विचार न करता पैसे परत केले. तुमचं प्रेम फक्त पैशांवर आहे, बाळासाहेबांवर नाही, अशी घणघणीत टीका एकनाथ शिंदेंनी केली.
पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला तरी काही आश्चर्य वाटणार नाही : एकनाथ शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, बाळासाहेबांनी म्हटलं होतं, माझी जेव्हा कॉंग्रेस होईल तेव्हा मी माझं दुकान बंद करेल. आता तुम्ही तुमचा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला तरी काही आश्चर्य वाटणार नाही. तुम्ही सत्तेसाठी एमआयएमचा पाठिंबा घेतला तरी काही वाटणार नाही. आता तुम्ही दहशतवादी संघटना हमासचीही गळाभेट घेऊ शकता. तुम्हाला शिवसैनिकांशी काही देण-घेणं नाही. मी आणि माझं कुटुंब यापुढे तुम्हाला काही दिसत नाही, असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी केला.
हेही वाचा :