ETV Bharat / state

Sandeep Deshpande : शिंदे गटाकडून मनसे पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवण्याचे प्रकार सुरू - संदीप देशपांडे - संदीप देशपांडे यांचे शिंदे सरकारवर आरोप

कार्यकर्त्यांचा सोबतच विविध पक्षांचे पदाधिकारी देखील फोडले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ( Sandeep Deshpande allegation on Shinde government ) करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून मनसे पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडे येण्यासाठी विविध आमिष दाखवले जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS leader Sandeep Deshpande ) यांनी केला आहे.

Sandip Deshpande
संदीप देशपांडे
author img

By

Published : Sep 29, 2022, 6:50 PM IST

मुंबई - शिवसेना कोणाची ? धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कोणाचं ? याचा वाद सुप्रीम कोर्टाकडून आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. बहुमताच्या जोरावर पक्षचिन्ह कोणाचं याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना असेल किंवा शिंदे गट असेल या दोन्ही बाजूंनी कार्यकर्ते जोडण्याचं पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र घेण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कार्यकर्त्यांचा सोबतच विविध पक्षांचे पदाधिकारी देखील फोडले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ( Sandeep Deshpande allegation on Shinde government ) करण्यात आला आहे. शिंदे गटाकडून मनसे पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडे येण्यासाठी विविध आमिष दाखवले जात असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS leader Sandeep Deshpande ) यांनी केला आहे.

संदीप देशपांडे

स्वतःचा गट वाढवण्यासाठी कार्यकर्ते का फोडता? - यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, " माध्यमातून ही जी काही माहिती आहे ती खरी आहे. अशा प्रकारच्या घटना भायखळ्यासारख्या परिसरामध्ये असतील की मुंबई इतरत्र असतील होत आहेत. आमच्या मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांना त्यांच्याकडून आमिष्य दाखवली जात ( Shinde group Baited to MNS officials ) आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांना विविध पदांची लालूच दिले जात आहे. संजय गटाचे लोक आमच्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत बैठका घेत आहेत. तुम्ही जी काही लोक बाहेर पडलेत तुमचा जो काही गट आहे त्याला आणखी मोठ करण्यासाठी तुम्ही इतर पक्षातील पदाधिकारी का फोडता?" असा सवाल आता मनसे कडून उपस्थित केला जात आहे.

शत्रू का वाढवताय? - पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "हा शिंदे गट शिवसेनेपासून पुढल्यामुळे आधीच त्यांचे बरेच शत्रू झाले आहेत. शिवसेना असेल इतर पक्ष असतील इतके शत्रू असताना मनसेचे पदाधिकारी फोडून आणखी शत्रू का वाढवता? शिंदे मनसे गट एकत्र येणार नाही. निवडणुकीसंदर्भात ज्या काही चर्चा माध्यमांमध्ये सुरू होत्या तशाबाबतची कोणतीही चर्चा आमच्या पक्षात अंतर्गत सुरू नव्हती. आगामी सर्व निवडणुका मनसे स्वबळावरच लढणार आहे आणि तशा प्रकारचे आदेश आम्हाला राज ठाकरेंनी दिलेले आहेत त्यामुळे आम्ही आमच्या तयारीला लागलो आहोत." अशी प्रतिक्रिया मानसी नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

सर्वांच्या भुवया उंचावल्या - दरम्यान, मनसेच्या या आरोपांमुळे आता सर्वांच्या भुवया उंचावले आहेत. कारण, अगदी काही दिवसांपूर्वीच भाजप असेल अथवा शिंदे गटाचे आमदार असतील यांच्या आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थया निवासस्थाने जाऊन त्यांची भेट घेतली होती. तर, राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या वाढत्या भेटीगाठीमुळे भाजप शिंदे गट आणि मनसे हे तिघे एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवणार अशा चर्चा सुरू ( Shinde group try to destroy MNS officials ) होत्या.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.