ETV Bharat / state

Sheetal Mhatre : राहुल गांधींना मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचे शुद्धीकरण कसे करणार ? - शीतल म्हात्रे - How to purify Aditya Thackeray

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ( Swatantryaveer Savarkar ) अपमान करणाऱ्या राहुल गांधीना ( Rahul Gandhi ) जाऊन मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचे शुद्धीकरण ( Purification of Aditya Thackeray ) नक्की कसे करणार ? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ( Balasahebchi Shiv Sena Party ) प्रवक्त्या शीतल म्हात्रे ( Spokesperson Sheetal Mhatre ) यांनी विचारला आहे.

Sheetal Mhatre
शीतल म्हात्रे
author img

By

Published : Nov 17, 2022, 6:57 AM IST

Updated : Nov 17, 2022, 7:10 AM IST

मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ( Swatantryaveer Savarkar ) अपमान करणाऱ्या राहुल गांधीना ( Rahul Gandhi ) जाऊन मिठी मारणाऱ्या आदित्य ठाकरेंचे शुद्धीकरण ( Purification of Aditya Thackeray ) नक्की कसे करणार ? असा सवाल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ( Balasahebchi Shiv Sena Party ) प्रवक्त्या शीतल म्हात्रे ( Spokesperson Sheetal Mhatre ) यांनी विचारला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांना तिलांजली देऊन राहुल गांधी यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याबद्दल युवराजाना या पापातून मुक्त करण्यासाठी गोमूत्राने अंघोळच घालावी लागेल, असा टोला म्हात्रे यांनी लगावला आहे. स्मृतीस्थळावर गोमूत्र शिंपडल्याच्या पार्श्वभूमीवर त्या बोलत होता.

शीतल म्हात्रे

गोमूत्र शिंपडून समधीस्थळाचे शुद्धीकरण : शिवसेनप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृती दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी स्मृती स्थळावर जाऊन बाळासाहेबांच्या समधीस्थळाचे दर्शन घेत होते. मात्र यानंतर काही वेळात शिल्लक सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडून समधीस्थळाचे शुद्धीकरण करण्याचा बालिशपणा केला, असा आरोप म्हात्रे यांनी केला.

आदित्य ठाकरे यांचे शुद्धीकरण कसे करणार? आयुष्यभर स्वातंत्र्यवीर सावरकर याना आपले स्फूर्तीस्थान मानणाऱ्या आणि त्यांचा अपमान करणारे काँग्रेस नेते मणीशंकर अय्यर यांना अद्दल घडवण्यासाठी जोडे मारो आंदोलन करणाऱ्या बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भारत जोडो यात्रेत जाऊन मिठी मारली, त्याच राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाहीर अपमान केला आहे. त्यामुळे या पापातून मुक्त होण्यासाठी आपले शुद्धीकरण आदित्य ठाकरे नक्की कसे करून घेणार ? असा बोचरा सवाल शीतल म्हात्रे यांनी विचारला आहे.

Last Updated : Nov 17, 2022, 7:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.