मुंबई : शरद पवार यांच्या डाव्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली होती. मोतीबिंदू काढण्यासाठी आज त्यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन महिन्यापूर्वी त्यांची तब्येत बिघडलेली असताना देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात हजेरी लावली. त्याचे कारण त्यांचा आत्मविश्वासाच्या जोरावर ते तब्येतीवर मात करतात हे अनेकदा सिद्ध झालेले आहे. जेवणावर नियंत्रण आणि सातत्याने होणारा व्यायाम यामुळे त्यांची प्रकृती उत्तम असते. मात्र, वयपरत्वे मोतीबिंदू आल्यास त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे जरुरी असते, त्यामुळेच आज शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
यापुर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते : शरद पवारांना नोव्हेंबर महिन्यात तब्येत खालावल्यामुळे तीन दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तब्येत बरी नसताना सुद्धा ते शिर्डीमध्ये (Shirdi) राष्ट्रवादीच्या शिबिराला (Attended the NCP camp) हजर होते. त्यावेळी पुन्हा ते रुग्णालयात आले होते. तसेच मार्च महिन्यात शरद पवारांना पित्ताशयाचा त्रास झाल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर शस्त्रक्रिया (Surgery) सुद्धा करण्यात आली होती.
2022 मध्ये शस्त्रक्रिया केली होती : शरद पवार (Sharad Pawar) यांना डाव्या डोळ्यावर मोतीबिंदू झाला होता. डिसेंबर 2022 मध्ये त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता ब्रिच कँडी रुग्णालयामध्ये आज डोळ्याच्या तज्ञ डॉक्टर यांच्याद्वारे त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल. आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस शरद पवार यांना आराम करणे सक्तीचे आहे. त्यानंतर पुन्हा ते पक्षाच्या कामानिमित्त सज्ज राहणार आहे. शरद पवारांचा नुकताच (NCP President Sharad Pawar) बारामती दौरा झाला आहे. त्यांनी बारामती तालुक्यातील सोमेश्वर नगर येथे आपल्या जुन्या मित्रांच्या गाठीभेटी (Sharad Pawar on Baramati Visit) घेतल्या. त्यांची विचारपूस केली. त्यांच्या अनेक प्रश्नांनी मित्रपरिवार भारावून (friend at Someshwar Nagar) गेला.
सैन्यदलात मुली भरती : त्यानंतर शरद पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, माझ्या संरक्षणमंत्री पदाच्या काळात मुली सैन्यदलात नव्हत्या. सैन्यदलात मुली भरती व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे आज मुली सियाचीनसारख्या भागात देशाचे रक्षण करत आहेत. महिलांच्या हाती कारभार दिल्यास देश पुढे जाण्यास वेळ लागणार नसल्याची प्रशंसा पवार यांनी (Baramati Visit meet old friend) केली.