ETV Bharat / state

Ajit Pawar On Sharad Pawar Resignation: शरद पवार राजीनाम्याच्या निर्णयावर दोन ते तीन दिवसात फेरविचार करणार- अजित पवार

author img

By

Published : May 2, 2023, 6:21 PM IST

Updated : May 2, 2023, 7:03 PM IST

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अध्यक्षपदाच्या राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राकॉंतील खासदार, आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यानंतर राकॉं नेते अजित पवार, खासदार सुप्रीया सुळे आणि इतर वरिष्ठ नेत्यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली. शरद पवारांना त्यांच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागलीत असे अजित पवारांनी माध्यमांना सांगितले आहे.

Ajit Pawar On Sharad Pawar Resignation
अजित पवार
शरद पवार राजीनाम्याबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया

मुंबई: शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी त्याला विरोध केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते शरद पवारांच्या भेटीला गेले आणि त्यांनी कार्यकर्त्यांची भूमिका सांगितली. त्यानंतर शरद पवारांनी या निर्णयाचा फेरविचार करणार असल्याचे सांगितलं. पण कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले तर शरद पवार आपला निर्णय बदलणार नाहीत असेही शरद पवारांनी सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.

  • #WATCH | "...we told him (Sharad Pawar) that workers are quite upset. We also told him that party workers want him to remain the party president along with having a working president. He said he will rethink his decision & requires 2-3 days...": NCP leader Ajit Pawar on Sharad… pic.twitter.com/8Fjb41QdDD

    — ANI (@ANI) May 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राजीनामा मंजूर केला जाणार नाही: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने राजीनामा देऊ नये. त्यांनी पक्ष कार्यालयात गर्दी न करता घरी जाण्याचे आवाहन अजित पवारांनी केले. पवारांना अनेक राज्यातीन नेत्यांचे फोन आले. पवारांना दु:ख होईल असे काम पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी करता कामा नये. रक्ताने पत्र लिहिणे, आंदोलने पवारांना आवडणार नाही, अशा स्पष्ट सूचना आहे. राकॉंच्या कुणाचाही पदाधिकाऱ्याचा, आमदाराचा राजीनामा मंजूर केला जाणार नाही, असे अजित पवारांनी स्पष्टच सांगितले.

शरद पवार काय म्हणाले? राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यानंतर शरद पवारांनी नव्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीसाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या समितीमध्ये प्रफुल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. ते अध्यक्षपदाचा निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत पक्षासाठी उपलब्ध असेन असे आश्वासनही शरद पवारांनी दिले.

आरे भारताचा बुलंद आवाज म्हण: राजीनाम्यावरून चर्चा चालू असतानाच खाली बसलेल्या एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने शरद पवारांच्या नावाने घोषणा दिली. ''महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार'' असे हा कार्यकर्ता म्हणाला. तेवढ्यात त्याच्याकडे रोखून बघणाऱ्या अजित पवारांनी लागलीच त्याच्या डोक्यावर टपली मारली. ''आरे भारताचा बुलंद आवाज म्हण'', असे अजित पवार त्या कार्यकर्त्याला म्हणाले आणि हसत तिथून निघून गेले. त्यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्येही हास्य उमटले.

हेही वाचा: Sharad Pawar Sports Leadership : क्रीडा विश्वातही शरद पवारांचा दबदबा; विविध संघटनांची पदे भूषवली

Last Updated : May 2, 2023, 7:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.