मुंबई - येत्या 25 जानेवारी रोजी आझाद मैदानात होत असलेल्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सहभागी होणार आहेत, अशी माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आव्हाड हे स्मृतिस्थळ येथे पोहचले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. बाळासाहेब हे एक मोठे व्यक्तिमत्त्व असून मी अनेक वर्षे बाळासाहेबांना अभिवादन करायला याठिकाणी येतो, असेही ते यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडी एकत्र आल्याने त्यांच्या पोटात गुडगुड -
महाविकास आघाडी एकत्र आल्याने त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. कोणी कोणाशी युती करावी, हे त्यांचे ते बघतील. परंतु महाविकास आघाडी एकत्र आल्याने त्यांच्या पोटात गुडगुड होत आहे, अशी टीका आव्हाड यांनी उल्लेख न करता राज ठाकरे यांनी लाड यांच्या भेटीवर केली. तसेच औरंगाबादचे संभाजीनगर हे नामांतर होणार का, हा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारला असता, त्यांनी वक्त देखेगा, असे सूचक प्रतिक्रिया दिली.
समितीचा अहवाल अभ्यास करून -
कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो-३ च्या आरेमधील कारशेडच्या विस्ताराला मर्यादा असून, पर्यावरणाचे आणखीन नुकसान होईल. त्यामुळे या प्रकल्पासाठी कांजुरमार्ग येथेच कारशेड सर्वार्थाने योग्य असल्याचा निर्वाळा मुख्य सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिला आहे. न्यायलयील लढाईत काय होईल याबाबत मी काय बोलणार, समितीने अहवाल दिला असेल तो अभ्यास करून दिला असेल, असेही ते यावेळी म्हणाले.
हेही वाचा - फडणवीसांचे एकीकडे बाळासाहेबांना अभिवादन; तर दुसरीकडे शिवसेनेला फटकारे