ETV Bharat / state

केंद्रात आम्हीच सरकार स्थापन करू, शरद पवारांचा विश्वास

देशातील अनेक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. तरीही निकालानंतर एकत्र येत युपीएचे सरकार स्थापन करण्यात आले. निकाल लागल्यानंतर काही दिवसात याबाबत सहमती होईल, असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला.

केंद्रात आम्हीच सरकार स्थापन करू, शरद पवारांचा विश्वास
author img

By

Published : May 4, 2019, 9:39 PM IST

मुंबई - पारंपरिक बारामती लोकसभेची जागा आम्हीच जिंकू, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच लोकसभेत महाआघाडीचे सरकार स्थापन करू, असेही त्यांनी म्हटले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार

देशातील अनेक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते. तरीही निकालानंतर एकत्र येत युपीएचे सरकार स्थापन करण्यात आले. निकाल लागल्यानंतर काही दिवसात याबाबत सहमती होईल, असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी देशात महाआघाडी करण्याची पूर्ण तयारी झाली. मात्र, ऐन निवडणूकीच्या तोंडावर उत्तरप्रदेशात समाजवादी आणि बहुजन पक्षाने वेगळी चूल मांडली. तर बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनीही स्वबळावर जाणे पसंत केले. यावर विचारणा केल्यानंतर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली.

देशात विरोधीपक्ष मिळून एक चांगला पर्याय देऊ शकते. यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण विरोधकांकडे ही सरकार चालवायची शक्ती आहे. २००४ मध्ये युपीएच्या सरकारने याचे उदाहरण दिले आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात १० वर्ष आघाडीच्या सरकारने देशाची धुरा वाहिली आहे. आता देशभरात काही धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र लढत नसल्या तरी आम्ही मिळून बहुमत सिद्ध करू शकतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बारामतीमध्ये चांगली परिस्थिती आहे. मतदारसंघात सहज फेरफटका मारला असता लोक चांगला प्रतिसाद देत आहेत. पण जनतेमधून एकही निवडणूक न लढवणारे भाजपचे नेते वारंवार दावा करत आहेत, की भाजप बारामती जिंकणार. सर्वच गोष्टी चांगल्या असताना असा दावा कशाच्या आधारावर केला जातो. म्हणजे मशीनमध्ये काही गडबड करून ते जिंकणार आहेत का? असा सवाल करत त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

पवारांकडून मनसेची पाठराखण

लोकसभेत मनसेचा एकही उमेदवार नव्हता. मग निवडणूक आयोगाने कोणत्या कायद्याच्या आधारावर मनसेकडे निवडणुकीचा खर्च मागितला, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, १९७७ मध्ये आम्ही काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी आणीबाणी होती. या आणीबाणीच्या विरोधात प्रसिद्ध लेखक पू. ल. देशपांडे यांनी महाराष्ट्रभर सभा घेतल्या होत्या. त्यावेळी निवडणूक आयोगाने देशपांडे यांना सभांचा खर्च विचारला हे माझ्या कधीही ऐकण्यात आले नाही. असे उदाहरण देत पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे.

Intro:केंद्रात आम्ही सरकार स्थापन करू, २००४ मध्येही अशीच स्तिथी होती - पवारांचा विश्वास

मुंबई ४

एकीकडे भाजप नेते शरद पवारांची पारंपरिक बारामतीची लोकसभेची जागा जिंकू असा दावा करत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेत महाआघाडीचे सरकार स्थापन करू असे सांगितले आहे . देशातील अनेक पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले होते ,तरीही निकालानंतर एकत्र येत युपीएचे सरकार स्थापन करण्यात आले असा दाखला ही पवार यांनी दिला. निकाल लागल्या नंतर काही दिवसात याबाबत सहमती होईल असा आशावादही पवार यांनी व्यक्त केला . लोकसभा निवडणुक जाहीर होण्यापूर्वी देशात महाआघाडी करण्याची पूर्ण तयारी झाली. मात्र ऐन निवडणूकीच्या तोंडावर उत्तरप्रदेशात समाजवादी आणि बहुजन पक्षाने वेगळी चूल मांडली , तर बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांनीही स्वबळावर जाणे पसंत केले ,यावर विचारणा केल्या नंतर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली .

देशात विरोधीपक्ष मिळून एक चांगला पर्याय देऊ शकते , यासाठी थोडा वेळ लागू शकतो पण विरोधकांकडे ही सरकार चालवायची शक्ती आहे . २००४ मध्ये युपीएच्या सरकरने याचे उदाहरण दिले आहे . माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वात दहा वर्ष आघाडीच्या सरकारने देशाची धुरा वाहिली आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले . आता देशभरात काही धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र लढत नसल्या तरी आम्ही मिळून बहुमत सिद्ध करू शकतो असेही त्यांनी यावेळी सांगितले .

दरम्यान बारामती मध्ये चांगली परिस्तिथी आहे. मतदार संघात सहज फेरफटका मारला असता लोक चांगला प्रतिसाद देत आहेत.पण जनतेमधून एकही निवडणूक न लढवणारे भाजपच्या नेते वारंवार दावा करत आहेत की , भाजप बारामती जिंकणार. सर्वच गोष्टी चान्गल्या असताना असा दावा कशाच्या धारेवर केला जातो , म्हणजे मशीन मध्ये काही गडबड करून ते जिंकणार आहेत का? असा सवाल करत त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला .

पवारांकडून मनसेची पाठराखण ....

लोकसभेत मनसेचा एकही उमेदवार नव्हता, मग निवडणूक आयोगाने कोणत्या कायद्याच्या आधारावर मनसे कडे निवडणुकीचा खर्च मागितला असा प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपस्तिथ केला आहे . पवार पुढे म्हणाले की ,1977 मध्ये आम्ही काँग्रेसमध्ये असताना, त्यावेळी आणीबाणी होती.या आणीबाणीच्या विरोधात प्रसिद्ध लेखक पू.ल.देशपांडे यांनी महाराष्ट्र भर आणीबाणीच्या विरोधात सभा घेतल्या होत्या . त्यावेळी निवडणूक आयोगाने देशपांडे यांना सभांचा खर्च विचारला हे माझ्या कधीही ऐकण्यात आले नाही. असे उदाहरण देत पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे . Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.