मुंबई - देश अडचणीतून जातोय. सामाजिक ऐक्य कसे राखता येईल याची चिंता आहे. देशाची सूत्रं ज्यांच्या हाती आहे त्यांनी एका विशिष्ट वर्गाच्या हातात सूत्र ठेवण्याची भूमिका घेतली आहे. सत्ताधाऱ्यांकडून एका लहान समाजाला टार्गेट केले जात आहे. ते आपल्या देशाचे आहेत का, यावर प्रश्न निर्माण केले जात असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. माजी आमदार हरिभाऊ बधे व अर्जुन सलगर यांनी वंचित बहुजन आघाडीतून रविवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते.
-
माजी आमदार हरिभाऊ बधे व अर्जुन सलगर यांनी वंचित बहुजन आघाडीतून आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्यातील वंचित समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने त्यांच्या या भूमिकेचे स्वागत आहे. pic.twitter.com/9n4wl0FoOH
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">माजी आमदार हरिभाऊ बधे व अर्जुन सलगर यांनी वंचित बहुजन आघाडीतून आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्यातील वंचित समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने त्यांच्या या भूमिकेचे स्वागत आहे. pic.twitter.com/9n4wl0FoOH
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 8, 2020माजी आमदार हरिभाऊ बधे व अर्जुन सलगर यांनी वंचित बहुजन आघाडीतून आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्यातील वंचित समाजाला न्याय देण्याच्या दृष्टीने त्यांच्या या भूमिकेचे स्वागत आहे. pic.twitter.com/9n4wl0FoOH
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 8, 2020
यावेळी बोलताना पवार म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यापासून मुस्लिम समाज सहभागी असताना त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याचे काम केले जात आहे. जनगणना सुरू झाली त्यात ओबीसींची स्वतंत्र गणना करण्याची आपली मागणी असल्याचे पवार म्हणाले. मात्र, ही जनगणना काही वेगळ्या प्रकारे सुरू आहे. त्यात एका विशिष्ट वर्गाला वगळण्याचे काम होत असल्याचा संशय पवारांनी व्यक्त केला.
हेही वाचा - "मिलिंद एकबोटेंना वढू गावात जाण्यास बंदी घालावी"
दरम्यान, धनगर आरक्षणाबाबत बोलताना पवार म्हणाले, आम्ही सत्तेत असताना धनगर आरक्षणावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. पण आज भाजपवाले यात अडथळे आणण्याचे काम करत आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिष्टमंडळ केंद्रात घेऊन गेलो होतो. त्यावेळी आम्हाला स्पष्ट शब्दात नकार देण्यात आला. केंद्राकडून आम्हाला उत्तर आले की, उत्तरेकडील काही राज्यात हे आरक्षण दिल्याने नाराजी निर्माण होईल. त्यामुळे हे होणं शक्य नाही. तेव्हा यासाठी आपण एकत्र येण्याचे काम करायचे आहे. हे काम केवळ महाराष्ट्रात करून चालणार नाही तर सबंध देशात करण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.