मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून बंडखोरी (Sharad Pawar Nationalist Party) करत सत्ताधारी पक्षात सहभागी झालेल्या नऊ लोकांवर आम्ही कारवाई करत आहोतच; (Ajit Pawar Notional Party) मात्र उरलेल्या आमदारांसाठी आमच्या पक्षाची बैठक उद्या दुपारी 1 वाजता होणार आहे. या बैठकीला मोठ्या प्रमाणात आमदार उपस्थित राहतील. (Jayant Patil Taunt Ajit Pawar) त्यावेळी आपल्या लक्षात येईल नक्की काय सुरू आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.
त्यांची नोशनल पार्टी : शरद पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष आहे. त्यामुळे जोपर्यंत शरद पवार मला या पदावरून दूर करत नाहीत, तोपर्यंत मला दुसरा कुणीही या पदावरून हटवू शकत नाही. त्यामुळे पक्षातून बाहेर पडलेल्या लोकांनी जी पार्टी स्थापन केली आहे ती नॅशनॅलिस्ट नाही नोशनल पार्टी आहे. त्यांनी कारवाई करून काहीही फरक पडणार नाही. तसेच आमचा पक्ष हा अगदी व्यवस्थित सुरू असून आम्हाला कायद्याची मदत घ्यायची गरज नाही असेही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
शरद पवार करणार महाराष्ट्रभर दौरा : पक्षाच्या आमदारांची आणि नेत्यांची उद्या बुधवारी एक वाजता बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दिल्लीत पुढील दोन दिवसात कार्यकारी समितीची बैठक घेतील. कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर शरद पवार हे स्वतः महाराष्ट्रभर दौरा करणार असून पुन्हा एकदा पक्षाची ताकद काय आहे हे दाखवून देण्याचा आमचा मानस आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. राज्यातील जनता आणि पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच आहेत. त्यामुळे शरद पवार हे नाशिकमधून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. त्यानंतर ते अहमदनगर, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांमध्येही दौरा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
नवाब मलिक आमचा सोबतच : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे अजित पवार यांच्यासोबत आहेत का? असे विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, भाजपसोबत नवाब मलिक कधी जातील असे निश्चितच वाटत नाही. ते आमच्या पक्षासोबतच आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा: