ETV Bharat / state

शरद पवारांनी घेतली दिलीप कुमार यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस - Sharad Pawar meets Dilip Kumar in hinduja hospital

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलीप कुमार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांनी ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली.

Dilip Kumar latest news
शरद पवारांनी घेतली दिलीप कुमार यांची भेट; प्रकृतीची केली विचारपूस
author img

By

Published : Jun 6, 2021, 7:47 PM IST

मुंबई - अभिनेता दिलीप कुमार यांना खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वास घेण्यास अडचण होत असल्याने दिलीप कुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याची बातमी आल्यानंतर प्रत्येक जण त्यांची प्रकृती उत्तम व्हावी, यासाठी देशभर प्रार्थना करत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलीप कुमार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शरद पवार यांनी ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली. तसेच दिलीप कुमार यांची प्रकृती उत्तम व्हावी, यासाठी प्रार्थनादेखील केली.

Dilip Kumar latest news
शरद पवार यांचे ट्वीट

सकाळी ट्वीट करून दिली होती माहिती -

'दिलीप साहेबांना नॉन-कोविड पी.डी हिंदुजा हॉस्पिटल, खार येथे रुटिन चाचणी व तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्यामुळे इथे आणले आहे. डॉ. नितीन गोखले यांच्या नेतृत्वात आरोग्य सेवा कर्मचार्‍यांचे पथक त्यांच्याकडे लक्ष देत आहे. कृपया त्यांची तब्येत लवकर सुधारावी, यासाठी प्रार्थना करा.”, असे ट्वीट त्यांच्या ट्वीटर हँडलवरून करण्यात आले होते.

हेही वाचा - शिवराज्यभिषेकदिनी संभाजीराजेंनी स्पष्ट केली आंदोलनाबाबतची भूमिका, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.