मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी 1978 मध्ये तत्कालीन काँग्रेसचे सरकार पाडून पुलोद (Shalini Patil On Sharad Pawar) आघाडी उभी केली होती. त्यावेळी सत्तेतील आमदार फोडून पवारांनी स्वतः आघाडी करत मुख्यमंत्री पद स्वीकारले होते. (NCP President Sharad Pawar) तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा कशाप्रकारे विश्वासघात केला हे त्यानंतर अनेकदा समोर आले आहे. मात्र, आता त्या सर्व गोष्टी जुन्या झाल्या असून त्याविषयी आपल्याला फार काही बोलायचे नाही, (Vasantdada Patil betrayal) अशी प्रतिक्रिया वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केली आहे.
वसंतदादांचा केला विश्वासघात : इंदिरा गांधी यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून इंदिरा काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला होता. अनेक नेते इंदिरा काँग्रेसमध्ये दाखल झाले. मात्र, शरद पवार आणि वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण हे नेते मात्र जुन्या काँग्रेसमध्येच राहिले. जुन्या काँग्रेसचे आणि इंदिरा काँग्रेसचे आमदार मिळून सत्ता स्थापन करण्यात आली. वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री करण्यात आले. परंतु, काही महिन्यातच शरद पवार यांनी सभागृह सुरू असताना अचानक आमदार फोडले आणि आपल्या गटात घेतले सभागृहातच आमदार आपली जागा सोडून दुसऱ्या बाजूला जाताना दिसत होते.
वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला : हे पाहताच सरकार कोसळते आहे हे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लक्षात आले. त्यांनी सभागृह तात्काळ स्थगित केले. मात्र, सरकार पडणार हे निश्चित झाल्याने वसंतदादा पाटील यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अशाप्रकारे शरद पवार यांनी वसंतदादा पाटलांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि सरकार पाडले. राजकारणात जे काही करायचे असते ते समोरून केले तर अधिक आदर्शवत आहे. अशा प्रकारे सत्ता मिळवणे योग्य नाही असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.
अजित पवारांनी केली पुनरावृत्ती : शरद पवारांनी ज्याप्रमाणे स्वतःचा पक्ष फोडून आपले सरकार स्थापन केले त्याप्रमाणे अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस फोडून शरद पवार यांना मोठा धक्का दिला आहे. अजित पवारांनी शरद पवारांचाही विश्वासघात केला आहे. त्यामुळे विश्वासघात केल्यानंतर काय सहन करावे लागते हे आता शरद पवार यांना उमगत असेल असेही शालिनीताई पाटील म्हणाल्या.
चर्चा करायला हवी होती: अजित पवार यांनी पक्ष सोडून गेल्यानंतर शरद पवार यांनी पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती. अजित पवार यांनी चर्चेतून मार्ग काढायला हवा होता असे म्हटले आहे. हीच गोष्ट 1978 मध्ये सुद्धा शक्य होती. शरद पवार यांनीसुद्धा चर्चा करून मार्ग काढायला हवा होता. मात्र तसे केले नव्हते त्यामुळे त्या गोष्टीची आता पुनरावृत्ती झाली असून अजित पवार यांचे राजकारण मात्र फार काळ टिकणार नाही. शरद पवार हे अतिशय धूर्त नेतृत्व आहे. शरद पवारांकडे असलेली राजकीय प्रगल्भता, देशपातळीवर असलेला संपर्क आणि मान्यता यांची तुलना करता अजित पवार हे त्यांच्यापुढे काहीच नाही. त्यामुळे अजित पवारांचे राजकारण फार काळ टिकणार नाही, असेही शालिनीताई पाटील यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा:
- Hasan Mushrif Welcome In Kolhapur: कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत; चौकात लागलेले बॅनर ठरले लक्षवेधी
- Maharashtra Political Crisis Update : मुश्रीफ यांचे कोल्हापुरात जंगी स्वागत, घाटगेंशी सामन्याची शक्यता
- Pankaja Munde News: दोन महिने सुट्टी घेणार, अंतर्मुख होऊन निर्णय घेणार -पंकजा मुंडे