ETV Bharat / state

मतमोजणी अधिकाऱ्यासमोरच मशीनमध्ये होती गडबड, शरद पवारांचा गौप्यस्फोट

author img

By

Published : Jun 10, 2019, 4:24 PM IST

लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमधील गडबडीमुळे देशभरात भाजपला यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनमध्ये मतमोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांसमोरच गडबड झाल्याचा गौप्यस्फोट आज मुंबईत केला.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटमध्ये नव्हे तर मतमोजणी अधिकाऱ्यासमोरील मशीनमध्ये होती गडबड, शरद पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई - लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनमधील गडबडीमुळे देशभरात भाजपला यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनीही ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीनमध्ये मतमोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांसमोरच गडबड झाल्याचा गौप्यस्फोट आज मुंबईत केला. याविषयी अनेक तज्ञांनी माहिती दिली असून त्यामधील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही देशभरातील मित्रपक्ष आणि इतर तज्ञांशी बोलून येत्या काळात निर्णय घेणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅटमध्ये नव्हे तर मतमोजणी अधिकाऱ्यासमोरील मशीनमध्ये होती गडबड, शरद पवारांचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20 व्या वर्धापनदिना निमित्त आज पक्षाकडून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयापासून जलदिंडी काढण्यात आली, तिचा समारोप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला, त्यावेळी झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले की, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशिनमध्ये गडबड नव्हती. तर मतमोजणी अधिकाऱ्यासमोर एक मशिन होते. त्या मशिनमध्ये खरी गडबड झाली आहे. या मशीन देशात दोनच कंपन्या बनवतात. त्यामध्ये एक केंद्र सरकारच्या आटोमिक एनर्जीची आणि केंद्राची एक कंपनी याची निर्मिती करते. याच कंपन्या या मशिनमध्ये सेटिंग करतात. ही सेटिंग करायला 8 ते 10 लोक लागतात, त्यापेक्षा अधिक लागत नाहीत. हे लोक संबंध देशाचे काम काही तासात करू शकतात, त्यामुळे यामधील आम्ही वस्तुस्थिती जाणून घेण्याचे काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

देशाचे नेतृत्व कारणाऱ्या घटकांना सर्वांना समोर घेऊन जाण्याच्या संकल्पनेला तिलांजली द्यायची आहे. म्हणूनच बाँम्ब स्फोटसारखे आरोप असलेले लोक आता संसदेत आणले आहेत. जगात आधुनिकतेला स्थान दिले जात असताना पंतप्रधान भगवे वस्त्र घालून गुहेत बसतात. लोकांच्या मनात जाणीवपूर्वक राष्ट्रवादाचा मुद्दा आणून देशात धार्मिक ध्रुवीकरण केले जात आहे. तर पाकिस्तानला घरात घुसून मारू, असे म्हणणारे निवडणूकीनंतर कसे शांत झाले हे आता देशातील लोक पाहत आहेत, असेही पवार यावेळी म्हणाले.

भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी देशातील जनतेचे ध्रुवीकरण केले हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकसाठी रणनीती बदलावी लागेल, असे म्हणाले आहेत.

राष्ट्रवादीचा चेहरा सध्या ग्रामीण आहे, यानंतर तो शहरीही झाला पाहिजे. राज्यात 50 टक्के लोक नागरी भागात असतात, प्रत्येक तालुक्यात नागरीकरण झाले आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण यशस्वी होणार नाही. नागरी भागात पक्षाची व्याप्ती वाढविण्यासाठी भर देण्याची गरज असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. आज नागपूर, चंद्रपुरात 50 टक्के लोक हिंदी बोलतात. त्या लोकांना सोबत घेणे आवश्यक आहे. यासाठीच मुंबईत आपल्या कामाचा विस्तार वाढवायचा आहे. त्यामुळे मुंबईत सगळ्या घटकांना सोबत घेऊन जायचे असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्व स्थिती पाहून जागांबाबत निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी नेत्यांना दिल्या.

तर महापालिका निवडणुकीत अधिक लोकांना संधी दिली तर ती प्रभावीपणे दिली गेली पाहिजे, असे पवारांनी सांगितले. त्याबरोबरच त्यांनी नेत्यांना महापालिकेवर लक्ष ठेवण्यासाठी सांगितले आहे. 20 वर्षांपूर्वी आपले लोक निवडून आले त्यावेळी हा पक्ष तरुणांचा पक्ष होता. त्यामुळे आज सगळ्या सत्तेच्या जागांवर नवी पिढी किती आहे, याची काळजी घेऊन तरुणांना अधिक संधी देण्याची गरज असल्याचे पवारांनी सांगितले.

Intro:ईव्हीएम-व्हीव्हीपॅटमध्ये नव्हे तर मतमोजणी करताना अधिकाऱ्याच्या समोर असलेल्या मशीनमध्ये सर्व गडबड होती
Body:ईव्हीएम-व्हीव्हीपॅटमध्ये नव्हे तर मतमोजणी करताना अधिकाऱ्याच्या समोर असलेल्या मशीनमध्ये सर्व गडबड होती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गौप्यस्फोट

(मोजोवर व्हिडीओ पाठवले आहेत)

मुंबई, ता. 10 :

निवडणुकीत भाजपाला आलेले यश मशीनच्या आज झालेल्या गडबडीमुळे झालेले असल्याचा दावा देशभरात होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माँ ईव्हीएम-व्हीव्हीपॅटया दोन्ही मशीन मध्ये काहीच गडबड झाली नाही जी गडबड झाली ती मतमोजणी करताना संबंधित अधिकाऱ्यांच्या समोर असलेल्या मशीन मध्ये झालेली असल्याचा गौप्यस्फोट आज मुंबईत केला
यासाठी मला अनेक एक्सपर्टने याविषयी माहिती दिली असून त्यातील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही देशभरातील मित्र पक्ष आणि इतर तज्ञांशी बोलून याविषयी येत्या काळात निर्णय घेणार असल्याचेही पवार यांनी आज मुंबईत सांगितले.

पवार म्हणाले की,मतमोजणी करताना एक अधिकारी बसतो, त्या अधिकाऱ्याच्या समोर एक मशीन असते तिथं त्यातून या दोन्ही मशीनची मतमोजणी झाली. इथून तिथे काय गेले, हे कोणाला कळले नाही ही गडबड तिथे आहे.तुम्ही पाहिले ज्यावर बटन दाबले, त्याची चिट्टी दिसली, त्यावर तुमचे समाधान झाले हे इथपर्यंत बरोबर होते, या दोन्ही मध्ये काही गडबड नव्हती.. मला काही एक्सपर्टनी याविषयी माहिती दिली. पण ज्या ठिकाणी मतमोजणीच्या ज्या मशीनमध्ये मतमोजणी झाली त्यात खरी गडबड झाली आहे, या मशीन देशात दोनच कंपन्या बनवतात. त्यात एक केंद्र सरकारच्या आटोमिक एनर्जीची आणि केंद्राची आणखी एक कंपनी याची निर्मिती करता, याच कंपन्या यात सेटिंग करतात. हे सेटिंग्ज करायला आठ ते दहा लोक लागतात, त्यापेक्षा अधिक लागत नाहीत. हे लोक संबंध देशाचे काम काही तासात करू शकतात हे इतके सोपे आहे.यात आम्ही वस्तुस्थिती जाणून घेण्याचे काम करणार असल्याचे पवार यांनी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 20व्या वर्धापनदिन निमीत्त आज पक्षाकडून मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य कार्यालयापासून जलदिंडी काढण्यात आली होती, तिचा समारोप यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाला, त्यावेळी झालेल्या समारोपाच्या कार्यक्रमात पवार बोलत होते.

ते म्हणाले की, देशाचे नेतृत्व कारणाऱ्या घटकांना सर्वाना समोर घेऊन जाण्याच्या संकल्पनेला तिलांजली द्यायचं आहे. म्हणूनच बॉम्ब स्फोटसारखे आरोप असलेल्या लोक आता संसदेत आणले आहेत यासाठीच.देशाचा पंतप्रधान गुहेत जाऊन बसतोय.जगात आधुनिकता याला स्थान दिले जात असताना पंतप्रधान भगवे वस्त्र घालून गुहेत बसतात. लोकांच्या मनात जाणीवपूर्वक राष्ट्रवादाचा मुद्दा आणून देशात धार्मिक ध्रुवीकरण केले, त्याना त्याचा राजकीय फायदा मिळाला. निवडणुकीच्या काळात आपण नोटबंदी, 15 लाख रुपयांवर बोलत राहिलो पण त्यांनी लोकांच्या मनावर खोटे चित्र रंगवले पाकिस्तानला घरात घुसून मारू असे म्हणणारे निवडणूक नंतर कसे शांत झाले हे आता देशातील लोक पाहत आहेत.त्यांनी जगातले कुठले देश शिल्लक राहिले हे माहीत नाही
त्यांच्याकडे वेळ आहे..मात्र निवडणुक
जिंकण्यासाठी ते देशातील जनतेचे ध्रुवीकरण करत होते हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे। विधानसभा निवडणुकीत रणनीती बदलावी लागेल असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादीचा चेहरा ग्रामीण केला आहे तो आता शहरीही झाला पाहिजे. राज्यात 50 टक्के लोक नागरी भागात असतात, प्रत्येक तालुक्यात नागरिकरण झालेले आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपण यशस्वी होणार नाही.नागरी भागात पक्षाची व्याप्ती वाढविण्यासाठी भर देउ या. नागरी प्रश्नासाठी संघर्ष करायला त्यासाठी जनमानस तयार करावा लागेल,आज नागपूर, चंद्रपुरातही 50 टक्के लोक हिंदी बोलत आहेत, त्या लोकांना सोबत घेणे आवश्यक आहे.यासाठीच मुंबईत आपल्या कामाचा विस्तार वाढवायचा आहे. मुंबई हे कॉस्मोपोलिटीन शहर आहे.मुंबईचे नेतृत्व हे इतर राज्यातील लोकांनी केले, त्याचा लोकांनी स्वीकार केला होता याची जाणीव करून देत मुंबईत सगळ्या घटकांना सोबत घेऊन जायचे आहे.. काय स्थिती असेल ते पाहून जागा घ्यायचा निर्णय घ्या अशी सूचना त्यानी पक्षातील नेत्यांना केली.

महापालिका निवडणुकीत अधिक लोकांना संधी दिली तर तो प्रभावीपणे दिलीं पाहिजे
महापालिकेवर लक्ष ठेवा, 20 वर्षापूर्वी आपले लोक निवडून आले त्यावेळी हा पक्ष तरुणाचा पक्ष होता म्हणून आपल्या आमदारांकडेन पहात होते...आज सगळ्या सत्तेच्या पदांच्या जागेवर नवी पिढी किती आहे, याची काळजी घेण्याची त्यांना अधिक संधी देण्याची गरज आहेनवे चेहरे दिले तर लोक बदल स्वीकारत असतात...त्यामुळे अनुभवी लोकांबरोबर तरुणांची संख्या अधिक हवी त्यातून निवडणुकीची तयारी केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकीमध्ये कामाची पद्धत बदलली आहे, सामाजिक माध्यमातूनच सहजपणे लोकांमध्ये जाता येते...फेसबुक, ट्विटर, आदींचा लाभ घेतली पाहिजे, आधुनिकता आपल्या कामाची गरज असल्याचेही पवार यांनी आवर्जून आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.

Conclusion:ईव्हीएम-व्हीव्हीपॅटमध्ये नव्हे तर मतमोजणी करताना अधिकाऱ्याच्या समोर असलेल्या मशीनमध्ये सर्व गडबड होती
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.