ETV Bharat / state

सैन्यदलाच्या अहमदनगरमधील के. के. रेंजच्या पुढील विस्तारीकरणास स्थगिती द्या; शरद पवारांची मागणी - sharad pawar meet rajnath singh

शरद पवार आणि पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अहमदनगरमधील के.के. रेंजच्या विस्तारीकरणामुळे स्थांनिकाना निर्माण होणाऱ्या अडचणी मांडल्या. के. के. रेंजच्या पुढील विस्तारीकरणास स्थगिती द्यावी आणि स्थानिकांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी शरद पवार यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली.

sharad pawar meet rajnath singh
शरद पवारांनी घेतली राजनाथ सिंह यांची भेट
author img

By

Published : Sep 18, 2020, 5:24 PM IST

नवी दिल्ली - सैन्य दलाच्या के. के. रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारामुळे अहमदनगर जिल्ह्यातील २३ गावांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. या गावांमधील लोकसंख्या ही आदिवासीबहुल असून त्यांचे उपजीविका व सुरक्षेबाबचे प्रश्न मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. संरक्षणमंत्र्यांकडे स्थानिकांच्या प्रश्नांची दखल घ्यावी तसेच के. के. रेंजच्या पुढील विस्तारीकरणास स्थगिती देण्याची मागणी केल्याचे पवार यांनी सांगितले. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके उपस्थित होते.

२३ गावांमधील बहुतांश लोकसंख्या आदिवासी आहे. कष्ट व मेहनत करून ते उपजीविका करतात. या आदिवासींना वनजमीन वाटपाची प्रक्रिया गेल्या काही काळापासून सुरू होती. मात्र, आता के.के. रेंज सराव प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे कारण सांगून त्यांना वाटप नाकारण्यात येत आहे. ही बाब शरद पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निदर्शनास आणून दिली.

राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर आर्थिक संस्थांकडूनही स्थानिकांना या कारणास्तव कर्ज नाकारले जात आहे. शूटिंग रेंजमुळे दुसरे मोठे प्रकल्पही इथे होऊ शकत नसल्याने येथील आदिवासी जनतेसाठी उत्पन्नाचे साधन नष्ट होऊ लागले आहे, हा मुद्दा शरद पवार यांनी संरक्षणमंत्र्यासमोर मांडला.

मुळा धरणामुळे हा भाग आता बागायती शेतीचा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येथील सुमारे एक लाख हेक्टर जमीन या धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. डाळिंब आणि उसाची शेती येथे केली जाते. त्यामुळे येथील लोकांचे इतरत्र स्थलांतर करणेही शक्य नाही. शूटिंगच्या सरावामध्ये येथील खारेकर्जुन गावातील अनेक स्थानिकांना आपला जीव गमवावा लागल्याचेही समोर आले आहे. गोळीबारामुळे स्थानिकांमध्ये धास्ती निर्माण होऊ लागली आहे, याचीही माहिती शरद पवार यांनी संरक्षणमंत्र्यांना दिली.

संरक्षणमंत्र्यांनी के.के. रेंजसाठी अधिक भूसंपादन होणार नाही याची ग्वाही दिली. सरावासाठी ही जमीन वापरण्याबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक अधिकारी यांच्याशी स्थानिकस्तरावर चर्चा करून निर्णय घेऊ, असे संरक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी अर्थमंत्र्यांशी बोलून वित्तीय संस्थांची बैठक बोलवण्यात येईल, कर्जाअभावी कोणाचीही विकास थांबू नये, अशी भूमिका संरक्षणमंत्र्यांनी मांडून आमदार नीलेश लंके व शिष्टमंडळाला आश्वस्त केल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा-व्यथा सांगण्यासाठी शेतकरी पुत्राने मागितली राज्यपालांच्या भेटीची वेळ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.