ETV Bharat / state

किती राज्यात भाजपाची सत्ता? शरद पवारांनी थेटच सांगितलं - शरद पवार बारामती

Sharad Pawar on BJP : देशातील किती राज्यांमध्ये भाजापाची सत्ता आहे याचा पाढाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वाचून दाखवला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 10:03 PM IST

बारामती(पुणे) Sharad Pawar on BJP : भारत देशाचा संपूर्ण नकाशा डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक राज्याचा विचार केला असता, ६० टक्के पेक्षा जास्त राज्यात भाजपाची सत्ता नाही. तसेच आगामी काळात हे चित्र देखील बदलेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केला. ते बारामतीत एका खासगी कार्यक्रमात बोलत होते.

किती राज्यात भाजपाचे सरकार नाही : केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, राजस्थान, दिल्ली, पंजाब, झारखंड या राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. गोव्यामध्ये काही आमदार फोडले तसेच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचे सरकार होते. मात्र, काहींनी वेगळी भूमिका घेतल्याने हे राज्य गेली. मध्यप्रदेशमध्ये सध्या निवडणुका झाल्या आहेत. त्याचा निकाल लागेल तो लागेल.. या आधी तेथे कमलनाथ मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात राज्य होतं. तिथे काही आमदार फोडले गेले आणि नंतर तिथे शिवराजसिंह चव्हाण यांचं सरकार आलं. एकंदरीत देशाचा विचार केला असता. ६० टक्क्यांपेक्षा जास्त राज्य भाजपाच्या हातात नाहीत. हा सध्याच्या लोकांचा कल आहे, असे शरद पवार म्हणाले.

केंद्र सरकारवर टीका : आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांचा निकाल काय असेल हे आज सांगणे योग्य नाही. मात्र, देशाचा चेंज स्पष्ट दिसत आहे. दिल्लीत बसलेले जे सत्ताधारी आहेत, त्यांच्या विचारांचे मत आज लोक व्यक्त करत नाहीत. ही स्थिती आज झाली आहे. या सगळ्या स्थितीमध्ये लोकांच्यामध्ये अस्वस्थता आहे. ती मांडण्याचे एकमेव साधन म्हणजे पत्रकारिता आहे. हे साधन प्रामाणिकपणे वापरावे, असेही पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा -

  1. नामदेव जाधवांवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शाई फेक
  2. Sharad Pawar : शरद पवार मराठा की ओबीसी?, पाहा शाळा सोडल्याचा दाखला
  3. Sharad Pawar On Viral Caste Certificate : जगाला माझी जात माहिती आहे; मी कधी जातीवाद केला नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.