मुंबई : मराठा मंदिर संस्थेला ७५ वर्षा पूर्ण झाल्या निमित्ताने अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने कार्यक्रमाचे मराठा मंदिर येथे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी अमृत महोत्सवी सोहळ्याची सांगता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे मुख्यमंत्री असल्याचे मराठा मंदिर संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीएम शिंदे यांचे कौतुक केले आहे. तसेच उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठा मंदिर संस्थेतर्फे शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
मराठा मंदिर संस्थेमध्ये काम करत असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची मुले उच्च शिक्षण घेवू इच्छित असतील. तर त्यांच्यासाठी शिष्यवृत्ती सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी 50 लाख रुपयांची देणगी स्वतः देत आहे. - शरद पवार
अनेकांनी मदत केली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा मंदिर संस्थेचे अध्यक्ष आहेत. बाबासाहेब गावडे यांनी या संस्थेची सुरुवात केली. ४० लोकांची ७८ वर्षापूर्वी बैठक झाली. अशी संस्था सुरू करावी अशी चर्चा झाली. पहिल्याच बैठकीत त्याकाळी साडेतीन हजार जमा झाले आणि संस्थेच्या कामाची सुरुवात झाली. त्याकाळी महाराष्ट्र बाहेर अनेक मराठी संस्थान होती त्यांनीही संस्था चालवण्यासाठी मदत केली.शैक्षणिक सांस्कृतिक कला शैक्षणिक क्षेत्रात संस्थेने मोठे काम केले आहे. मराठा मंदिर या वास्तूचे भूमिपूजन चिंतामणराव देशमुख यांनी केले होते. याचे उद्घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले होते.
मराठी मुलं नौदलात हवी : राज्यातील मराठीत मुले नौदलात जावे, या उद्देशाने अलिबागला संस्थेने जागा घेतली. मात्र वनविभागाकडून संस्थेला प्रेमाची नोटीस देण्यात आली आहे. नोटिसनंतर जागेचे काम थांबवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आपण आपल्या सोयीने आम्हाला या प्रकरणी वेळ देऊन या संदर्भात बैठक घ्यावीआणि मार्ग काढावा. मराठी मुले नौदलात गेली पाहिजे, अशा प्रकारची खंत शरद पवार यांनी यावेळी बोलून दाखवली.
मुख्यमंत्र्यांचे कौतुक : माधवराव सिंधिया माझ्या पूर्वी या संस्थेचे अध्यक्ष होते त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने या संस्थेला मदत केली. यात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ यत किंचितही न ठेवता काम करणारे या संस्थेत सहकारी असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. राज्याचे मुख्यमंत्री काही अडचणी असताना सुद्धा या कार्यक्रमासाठी आले. मुख्यमंत्र्यांना देखील प्रश्नांची जाण असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.यावेळी मराठा मंदिरच्या स्मरणिकेचे व अस्मिता महाराष्ट्राच्या ई-बुकचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष शरद पवार यांच्या व मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन देखील करण्यात आले. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संस्थेचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री उदय सामंत, मंत्री चंद्रकांतदादा पाटील इतर सहकारी उपस्थित होते.
हेही वाचा :
- CM Eknath shinde : मरणाऱ्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणे योग्य आहे का? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना प्रश्न
- Praveen Darekar Criticizes Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणजे उत्तम चोर माणूस, दरेकरांचा हल्लाबोल
- PM Care Fund Scam : पीएम केअर फंडाचा निधी गेला कुठे.? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल