मुंबई : आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषद घेत, जे सरकारनं चित्र स्पष्ट केलं आहे, तसंच तिन्ही पक्षानं जी आरक्षणावर भूमिका घेतली आहे, याला सर्वांची मान्यता होती. मग आताच छगन भुजबळ यांनी असं बोलण्याची गरज काय होती? भुजबळांना संभ्रम निर्माण करण्याची गरज काय होती? अशी टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी भुजबळांवर केली.
सरकारमध्ये समन्वय नाही : भुजबळांच्या या वक्तव्यावरुन सरकारमध्येच समन्वय नसल्याचं दिसून येत आहे. तसेच दोन मंत्र्यांची वेगवेगळी वक्तव्यं येत असताना, नेमकं सरकारमध्ये चाललंय काय. असा सवाल यानिमित्तानं उपस्थित केला जात आहे. यावेळी पुढे बोलताना, देसाई म्हणाले की, मराठा आरक्षणावरून छगन भुजबळ हे संभ्रम निर्माण करत आहेत. याबाबत आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांची भेट घेणार आहोत. जी काही चर्चा झाली आहे. त्याबाबत स्पष्ट भूमिका मांडणार आहोत, असं देसाई म्हणाले.
उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा : ओबीसी आरक्षण आम्ही काढून मराठा आरक्षण देणार नाही, हे मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. तरीसुद्धा भुजबळांचं हे वक्तव्य म्हणजे दोन गटात संभ्रम निर्माण करणारं आहे, असं देसाई म्हणाले. यावर कदाचित उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक होवू शकते. त्यात आम्ही यावर चर्चा करु, असं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.
...तर त्यांना आपण वेगळे केले हे दाखवयचे आहे का - मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण याबाबत तिन्ही पक्ष व त्यातील मंत्री व नेते यांच्यात स्पष्टता होती. मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र देण्यासाठी सरकारने काही वेळ जरांगे-पाटील यांच्याकडे मागितला आहे. त्यावर तज्ज्ञांचं काम सुरू आहे. हे असे असताना, मग आत्ताच भुजबळांना असं वक्तव्य करुन आपणच काही तरी वेगळं करतोय किंवा समाजासाठी आपण वेगळी भूमिका घेतली, असं भासवायचं आहे का? असा सवाल यावेळी देसाई यांना उपस्थित केला. जे होणार नाही ते होणार आहे, असं दाखवायचं आणि त्याचं श्रेय घ्यायचं हे चुकीचे आहे. प्रसारमाध्यमांसमोर असं झालं तर तसं होईल, हे बोलणं म्हणजे संभ्रम निर्माण करणारे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीला चांगलं यश मिळालं, त्यावर संजय राऊत यांनी बोलावे, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.
हेही वाचा :