ETV Bharat / state

Shambhuraj Desai On Bhaskar Jadhav : भास्कर जाधव यांची चौकशी करा; शंभूराज देसाईंची मागणी, काय आहे प्रकरण?

Shambhuraj Desai On Bhaskar Jadhav : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी दंगली संदर्भात केलेले (possibility of riots in state) वक्तव्य अंगलट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात आगामी काळात दंगली घडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी भास्कर जाधव यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (Shiv Sena Dussehra gathering)

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 4, 2023, 4:29 PM IST

Shambhuraj Desai On Bhaskar Jadhav
शंभूराज देसाईंची मागणी
भास्कर जाधवांबद्दल शंभूराज देसाईंचे मत

मुंबई : Shambhuraj Desai On Bhaskar Jadhav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे. निवडणूक आयोगाने घटनेने, कायद्याने शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण आम्हाला दिलेला आहे. दसऱ्याला शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होत असतो. ज्यांची धनुष्यबाण आणि शिवसेना त्यांचा शिवतीर्थावर दसरा मेळावा असे सूत्र आहे. त्यामुळे त्या संदर्भातील निवडणूक आयोगाचे कागदपत्र आणि पक्षाची रीतसर विनंती मुंबई महानगरपालिकेकडे केली आहे. आम्हालाच शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिका परवानगी देईल विश्वास देखाील शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

भास्कर जाधव यांना आवाहन: ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दंगली भडकवण्यासंदर्भात वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शंभूराज देसाई म्हणाले की, कोण दंगली करणार आहे, भडकवणार आहेत याची माहिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी ती पोलिसांना द्यावी. दंगली होऊ नये हे सर्वांचं मत आहे. राज्यात शांतता राखली गेली पाहिजे. भास्कर जाधव यांच्याकडे माहिती असेल तर पोलिसांनी देखील त्यांना चौकशीसाठी बोलावले पाहिजे. कशाच्या आधारे अशा प्रकारची वक्तव्य केले आहे. तुम्ही ती माहिती लपवता आहात का? आमच्या पोलीस प्रशासनाकडे ती माहिती द्यावी पोलीस प्रशासन चौकशी करेल आणि कारवाई करेल. प्रक्षोभक वक्तव्य करून विनाकारण संभ्रम महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात करू नये, असं आवाहन देसाई यांनी भास्कर जाधवांना केले आहे.

सत्याच्या बाजूने निर्णय देतील: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विधान मी ऐकलं नसून यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. माध्यमातून सातत्याने बातम्या चालवत आहे की, विधानसभा अध्यक्ष काय भूमिका घेणार, कधी निर्णय घेणार याचा कदाचित संदर्भ असेल. नियमातल्या कायद्याच्या तरतुदीत बसून निर्णय घेईल हे म्हणणं योग्य आहे. दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेऊन पुरावे पाहून सत्याच्या बाजूनेच निर्णय विधानसभा अध्यक्ष देतील असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

चांगलं काम करत आहोत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिल्लीमध्ये गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्यात काय चर्चा झाली याविषयी मला माहिती नाही. तसं मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत माझी भेट झालेली नाही. त्यामुळे या भेटीवर अधिक भाष्य करणे योग्य होणार नसल्याचं देसाई यांनी म्हटले आहे. शासनाची प्रतिमा मलिन होते हे म्हणणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटले आहे. मराठा धनगर ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, याबाबत सरकारने टाईम बॉम्ब कार्यक्रम ठरविला आहे. या सर्वांतून मार्ग काढण्याचा प्रयत्न उच्च स्तरावर सुरू आहे. सरकार आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे. विरोधी पक्षाने केलेल्या टीकेवर महाराष्ट्रातील जनता निश्चितपणे विश्वास ठेवणार नाही. ज्या वेगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे. राज्यातील जनता खंबीरपणे आमच्या मागे उभी राहील, असे देखील शंभूराज देसाई म्हणाले.

हेही वाचा:

  1. Guardian Minister : राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरले! अजित पवारांना 'या' जिल्ह्याची जबाबदारी
  2. Lalu Yadav Bail : जमीन घोटाळा प्रकरणात लालू यादव व कुटुंबियांना जामीन मंजूर
  3. Nanded Patients Death Case : 'त्या' प्रकरणी खासदार हेमंत पाटलांवर गुन्हा दाखल; डॉक्टर्सनी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा दिला होता इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.