मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अविश्वास ठरावावर बोलताना, महाराष्ट्रातील वसंतदादा पाटील यांचे सरकार शरद पवार यांनी पाडल्याचा उल्लेख केला. वसंतदादा यांचा 35 वर्षानंतर संसदेत गौरव केला आहे ही अभिमानास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया, शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केली आहे. शरद पवारांनी वसंतदादा यांचे सरकार पाडल्यानंतर घडलेल्या घडामोडी देशाला माहिती आहेत. मात्र त्याचा 35 वर्षानंतर संसदेत उल्लेख होणे आणि वसंतदादांचा गौरव होणे ही आमच्या परिवारासाठी अभिमानाची बाब असल्याचे शालिनीताई पाटील म्हणाल्या.
भ्रष्टाचारी माणसाला आपल्या पक्षात घेणे अयोग्य : अमित शाह यांनी नुकतेच अजित पवार यांना आपल्या सरकारमध्ये सहभागी करून घेतले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री पदसुद्धा दिले आहे. वास्तविक अजित पवार हे अत्यंत भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी 25 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. तसेच आपल्या कारखान्याला गिळंकृत केले आहे. तसेच अन्य 13 कारखानेसुद्धा त्यांनी आपल्या घशात घातले आहेत. अशा भ्रष्टाचारी माणसाला आपल्या पक्षात घेणे अयोग्य आहे, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.
भ्रष्टाचारी अजित पवारांवर कारवाई करा : सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी आरोपी करण्याचे आदेश दिलेल्या व्यक्तीला आपण निमंत्रण देऊन आपल्या पक्षात बोलावता, ही अत्यंत चुकीची गोष्ट असल्याची प्रतिक्रिया शालिनीताई पाटील यांनी दिली. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि अजित पवार यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय हा राज्यातल्या जनतेच्या आणि जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या हजारो सभासदांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. त्यामुळे ताबडतोब आपण या संदर्भात कारवाई करावी आणि अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना शिक्षा द्यावी अशी मागणी शालिनीताई पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा -
- Devendra Fadnavis : जयंत पाटील यांची अमित शाहांसोबत भेट....; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
- AMIT SHAH IN LOK SABHA : दिल्ली हे पूर्ण राज्य नाही संसदेला पूर्ण अधिकार - शहा, दिल्ली सेवा विधे्यक लोकसभेत मंजूर
- Monsoon Session 2023 : मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव; राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून व्हिप जारी