ETV Bharat / state

Sexual Abuse Of Minors By Principal : विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण, मुख्यध्यापकावर गुन्हा दाखल - मुख्याध्यापका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण

वरळी पाठोपाठ नागपाडा परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. 14 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी 55 वर्षीय मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना आज सोमवार रात्री उशिरा घडली आहे.

File Photo
File Photo
author img

By

Published : Jan 23, 2023, 10:54 PM IST

मुंबई : मुलीचे प्रेमसंबंध घरी सांगण्याची धमकी देऊन आरोपी मुख्याध्यापकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पीडित मुलीला (दि. डिसेंबर २०२२)मध्ये आरोपीने प्रेम संबंध घरी सांगण्याबाबत धमकावले होते. तिचे एका मुलाशी असलेले प्रेमसंबंध आईला सांगण्याची धमकी देऊन आरोपीने तिला वाईटरित्या स्पर्श केला. तसेच, लैंगिक शोषण केल्याचे देखील तक्रारीत नमूद केले आहे. (दि. 28 डिसेंबर 2022 ते 22 जानेवारी 2023) या कालावधी दरम्यान गुन्हा घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

मुख्याध्यापकाच्या कार्यालयात हा प्रकार घडला : ही घटना पीडित मुलीने आईला सांगितल्यानंतर पीडित मुलीच्या आईने याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी लैंगिक अत्याचार, विनयभंग, धमकावणे यांच्यासह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोस्को) गुन्हा दाखल केला. या तक्रारीनुसार मुख्याध्यापकाच्या कार्यालयात हा प्रकार घडला. याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.

वरळीतही अशीच घटना : शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या वरळी भागात अवघ्या 20 महिन्यांच्या चिमुरडीवर एका 35 वर्षीय नराधामाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर वरळी पोलिसांनी काल आरोपीला अटक केली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

आपल्या घरी नेऊन तिचे लैंगिक शोषण : वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपी आणि पीडिता दोघेही एकाच परिसरातील रहिवासी असल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीची आई काही काळासाठी घराबाहेर गेली असताना आरोपीने मुलीला आपल्या घरी नेऊन तिचे लैंगिक शोषण केले. पीडितेची आई परत आल्यावर मुलगी रडत असल्याने तिला काही तरी संशय आला. तिने मुलीला जवळच्या रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मुलीवर बलात्कार झाल्याचे सांगितले, असे पोलिसांनी सांगितले. मुलीच्या आईने जवळचे पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आज कारवाई केली आणि आरोपीला काल अटक करण्यात आली, असे परळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.

हेही वाचा : वरळीत 20 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार; आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.