मुंबई: चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात आयोजित 66 व्या राष्ट्रीय रेल्वे पुरस्कार 2021 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते पश्चिम रेल्वेवरील सर्व विभागातील सात अधिकारी आणि कर्मचारी पुरस्कार प्राप्त आहेत.
यात मुंबई विभागातील सीनियर सेक्शन इंजिनियर/सी एंड डब्ल्यू रुपेश कुमार जैन, मोटरमन/चर्चगेट प्रमोद सारंगी, सीनियर सेक्शन इंजिनियर सुरेंद्रनाथ द्विवेदी, निरीक्षक/ आरपीएफ नरेंद्र यादव, पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर आणि जगजीवन राम रुग्णालयातील वरिष्ठ मंडळ चिकित्सा अधिकारी डॉ. योगानंद पाटिल आणि रतलाम विभागातील ट्रॅक मेंटेनर गंगा बिशन मीणा यांना महाव्यवस्थापकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय कार्याचे प्रशस्तीपत्र आणि 10 हजार रोख रक्कम या स्वरूपातील पुरस्कार पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्याद्वारे देण्यात आले. अनिल कुमार लाहोटी यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या मेहनतीचे आणि कार्याप्रती असलेल्या समर्पणाचे कौतुक केले. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना भविष्यातही चांगले काम करत राहण्यासाठी प्रोत्साहित केले.