ETV Bharat / state

Sessions Court Issued Warrant : 'या' भाजप नेत्यांविरोधात सत्र न्यायालयातून वॉरंट जारी; लगेच 'या' कारणामुळे केला रद्द - भाजप नेत्यांविरोधात सत्र न्यायालयातून वॉरंट जारी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या विरोधात आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने जामीनपात्र वॉरंट जारी केला होता. आज सुनावणीदरम्यान नार्वेकर आणि लोढा उपस्थित नसल्याने वॉरंट जारी केला होता. मात्र, त्यानंतर तत्काळ न्यायालयात हजर झाल्याने न्यायालयाने वॉरंट रद्द केला आहे. या प्रकरणात आणखी दोन हजर न राहिलेल्या आरोपीं विरोधात मात्र वॉरंट कायम आहे. सर्व आरोपी आज हजर नसल्याने आजही आरोप निश्चित करण्यात आले नाही आहे.

Sessions Court Issued Warrant on BJP Leaders
'या' भाजप नेत्यांविरोधात सत्र न्यायालयातून वॉरंट जारी; मात्र लगेच 'या' कारणामुळे केला वॉरंट रद्द
author img

By

Published : Jan 20, 2023, 9:42 PM IST

मुंबई : विद्यमान मंत्री मंगल प्रभात लोढा आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर 2020 मध्ये विरोधी पक्ष असताना कोरोना काळामध्ये वाढीव वीजबिले आकारण्यात आली होती. त्यावेळी बेस्ट विरोधात आंदोलन करण्यात आले होते. यामुळे नागरिक हवालदिल झाले होते. त्यावेळी नार्वेकर आणि लोढा यांच्यासह भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन पुकारले होते.

भाजपच्या 20 जणांविरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : या दरम्यान बेस्टच्या महाव्यवस्थापकांना रोखण्याचा प्रयत्नही केला. याबाबत फौजदारीसह विविध कलमांतर्गत लोढा आणि नार्वेकर यांच्यासह अन्य 20 जणांवर विरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणात आरोप पत्र दाखल करण्यात आले असून आरोप निश्चिती करण्याकरिता या सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दिले होते मात्र काही आरोपी हजर नसल्याने आजही आरोप पत्र निश्चित करण्यात आले नाही.

दोन्ही नेते न्यायालयात हजर झाल्याने वाॅरंट रद्द : या प्रकरणात आज या सर्व 20 आरोपीं विरोधात आरोप निश्चित करण्यात येणार होते. मात्र, आजही आरोपी उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात न्यायाधीश राहुल रोकडे यांनी जामीन पात्र वॉरंट जारी केले होते वॉरंट जारी केले नंतर तातडीने या प्रकरणातील अनेक आरोपी न्यायालयात हजर झाले त्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील हजेरी लावली होती त्यानंतर या दोन्हीही नेत्यांनी विरोधात जारी करण्यात आला आहे मात्र या प्रकरणातील आणखी दोन आरोपी हजर नसल्याने आरोप निश्चिती आजही करण्यात आली नसल्याने आता पुढील तारखेला यावर आरोप निश्चिती करण्यात येणार आहे पुढील तारखेला जर हजर नसल्यास त्या आरोपीं विरोधात वारणद्वारी करण्यात येईल असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.