मुंबई : मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये पीडित महिलेच्या वतीने वकिलांनी जोरदार बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेने आपल्या याचिकेत महत्त्वाचे गंभीर आरोप मंगेश सातमकर यांच्यावर केलेले आहेत. पीडित तरुणी ही युवती सेनेची पदाधिकारी आहे. मंगेश सातमकर यांनी डिसेंबर 2022 या काळामध्ये मुंबई बाहेर हॉटेलवर नेले होते. त्यावेळेला तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर दोन ते तीन महिन्यानंतर तिला दिवस गेल्याचे लक्षात आले. तिने याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांना लग्न करण्यासंदर्भात विनंती केली. त्यांनी तिला तसे आश्वासन देखील दिले, मात्र ते खोटे आणि फसवे आश्वासन होते, असा पीडितेने दावा केला.
गोळ्या देण्याचे कटकारस्थान : त्याचबरोबर याचिकेमध्ये हा देखील भाग अधोरेखित केलेला आहे की, मंगेश सातमकर यांना वैद्यकीय उपचार त्या मुलीवर कोणता करावा, या संदर्भात सल्ला देणारा डॉ. अजित गावडे याच्यावर देखील पीडित तरुणीने आरोप केलेला आहे. मंगेश सातमकर यांनी पीडित तरुणीशी अनैतिक संबंध केले. लग्नाचे आमिष दाखवले, पण जेव्हा ती गरोदर असल्याचे लक्षात आले, डॉक्टर अजित गावडे यांच्या मदतीने तिला गर्भपात करण्यासाठीच्या अनेक गोळ्या देण्याचे कटकारस्थान मंगेश सातमकर यांनी रचले असल्याचे त्यात म्हटले आहे.
उच्च न्यायालयात जाणार : यासंदर्भात पीडित मुलीची बाजू मांडणाऱ्या वकील संजना हळदणकर यांनी सांगितले की, त्या मुली संदर्भात जो पंचनामा केला, त्यात मुलीने जी जबाब दिला आहे. नंतर चौकशीअंती ते सर्व खरे असल्याचे देखील निष्पन्न झाले. संबंधित पोलीस अधिकारी यांच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. परंतु मुलीच्या बाजूने सर्व पुरावे देऊनही सत्र न्यायालयासमोर सर्व पुरावे पोलिसांनी येऊ दिले नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. मंगेश सातमकर हे प्रभावी व्यक्ती असल्यामुळे पोलिसांनी पीडित महिलेच्या बाजूने निकालाचा लढा दिलाच नाही. अखेर न्यायालयात त्यांना जामीन दिला गेला आहे. परंतु आम्ही उच्च न्यायालयात न्याय मागण्यासाठी जाणार आहोत. पीडितेला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा चालूच राहणार असल्याचे यावेळी हळदणकर यांनी स्पष्ट केले.
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध : वकील संजना हळजणकर यांनी असे देखील नमूद केले की, आम्ही पोलिसांना वारंवार विनंती केली की चौकशीच्या संदर्भात न्यायालयामध्ये सदर डॉक्टर अजित गावडे हा मंगेश सातमकर यांचा ओळखीचा आहे. त्याला हजर करायला हवे. यासंदर्भात पोलिसांनी गंभीरपणे दखल घेतलीच नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ईटीव्ही भारतसोबत संवाद साधताना वकील संजना हळदणकर या म्हणाल्या की, मंगेश सातमकर शिवसेना पक्षाचा माजी नगरसेवक आहे. अत्यंत घाणेरड्या रितीने आपल्या परिसरातील युवती सेनेच्या पदाधिकारी महिलेसोबत त्याने लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवले. तिला गर्भधारणा झाली आणि हे बिंग बाहेर फुटू नये म्हणून तिचा गर्भपात देखील केला. न्यायालयाने जामीन जरी दिला असला तरी उच्च न्यायालयामध्ये आम्ही न्याय मिळण्यासाठी जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच पोलिसांनी पीडित महिलेच्या बाजूने सर्व पुरावे न्यायालयासमोर घेण्याबाबत कोणतीही गंभीरपणे दाखल घेतली नाही. कारण आरोपी हा राजकीय पक्षाचा माजी नगरसेवक आहे, त्यामुळे हे झाले असल्याचा आरोप देखील वकिलांनी केला.
हेही वाचा :