मुंबई : पंजाब नॅशनल बँक ( Punjab National Bank ) प्रकरणातील फरार आरोपी व्यापारी नीरव मोदीची ( Famous diamond merchant Nirav Modi ) 500 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याकरिता मुंबई सत्र न्यायालयात अंमलबजावणी संचालनालयाकडून याचिका करण्यात आली होती. ही याचिका आज न्यायालयाने मंजुरी देत नीरव मोदीला दणका दिला आहे. संबंधित 500 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश ईडीला देण्यात आले आहे.
नीरव मोदी याची दक्षिण मुंबईच्या मध्यभागी असलेली रिदम हाऊस जप्त करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाकडून याचिका करण्यात आली होती. तसेच अलिबागमधील बंगल्यातून जप्त करण्यात आलेल्या मौल्यवान वस्तू, 22 गाड्या ईडीला जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
ईडीची याचिका मंजूर : पंजाब नॅशनल बँकेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात विशेष न्यायालयाने बुधवारी मुख्य आरोपी आणि फरारी हिरे व्यापारी नीरव मोदीच्या रिदम हाऊससह एकूण 39 मालमत्ता आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत 500 कोटी रुपयाची संपत्ती जप्त केले जाणार आहे. यासंदर्भात न्यायालयाने ईडीचा याचिका मंजूर केली आहे.
मालमत्ता जप्त करण्याची परवानगी : न्यायालयाच्या आदेशाने त्याची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी देण्याची ही दुसरी वेळ आहे. तत्कालीन नवीन कायद्यानुसार डिसेंबर 2019 मध्ये व्यावसायिकाला आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते. ज्यामुळे अशा फरारी गुन्हेगाराच्या संपत्तीची जप्ती कोर्टाने आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत जप्त करण्याचे घोषणा केली होते. अशा घोषणेनंतर जप्ती ही पुढची पायरी असेल. या उदाहरणात केल्याप्रमाणे मालमत्ता जप्त करण्यासाठी याचिका करावी लागेल. ज्या मालमत्ता जप्त करण्याची मागणी करण्यात आली होती. ती प्रथम ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत जप्त केली होती. कोट्यवधींच्या फसवणुकीत, मोदींनी फसव्या लेटर्स ऑफ अंडरटेकिंग जारी करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकेची फसवणूक केली. हे प्रकरण उघडकीस येईपर्यंत बँकेच्या मुंबई शाखेने मार्च 2011 पासून नीरव मोदीच्या कंपन्यांच्या समूहाला फसव्या पद्धतीने जारी केले होते.