मुंबई - राज्यातील स्मार्ट फोन, मोबाईल धारक आणि संगणकावर आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांसाठी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जोकर नावाचा मालवेअर बहुतांश मोबाईल धारक आणि संगणकाचा वापर करणाऱ्या व्यक्तींच्या संगणकात पोहचत असल्याचे समोर आले. महाराष्ट्र सायबर विभागाकडून केल्या जात असलेल्या तपासादरम्यान हे समोर आले आहे. याबाबत विभागाकडून खुलासा करण्यात आला.
हा जोकर नावाचा मालवेअर खास करून तुमच्या मोबाईल आणि संगणकात असलेली बँकिंग व्यवहाराच्या संदर्भात महत्वाची माहिती गोळा करतो. तसेच ती सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहचवत आहे, असे महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुख यशस्वी यादव यांनी सांगितले. हा मालवेअर तुमच्या नकळत तुमच्या मोबाईल किंवा संगणकात शिरून तुमच्या ऑनलाईन आर्थिक व्यवहाराच्या सर्व गोष्टी जमा करत आहे. तुमच्या मोबाईलवर येणारे ओटीपी, पासवर्ड तुमच्या नकळत मिळवून तुमचे बँक खाते रिकामे करीत आहे.
कसा पोहचतो जोकर मालवेअर?
सायबर गुन्हेगार हे नागरिकांच्या मोबाईलवर काही आकर्षक मेसेज, लिंक तुमच्या मोबाईल वर एसएमएस, ईमेल किंवा व्हाट्सअॅपद्वारे लिंक पाठविण्यातत येते. या लिंकवर जर चुकूनही तुम्ही क्लिक केले तर तत्काळ तुमच्या मोबाईल किंवा संगणकात हा जोकर मालवेअर जाऊन लपतो. यानंतर तुमच्या प्रत्येक ऑनलाईन आर्थिक व्यवहारांवर हा मालवेअर नजर ठेवतो.
यासाठी काय करावे?
तुमची संपूर्ण गुप्त माहिती चोरली जात आहे. यामुळे तुमच्या मोबाईलवर येणारे अनोळखी व्हाट्सअॅप लिंक, एसएमएससारख्या लिंक वॉर क्लिक नका. अशा प्रकारचे मेसेज किंवा लिंक आल्यास ती तत्काळ डिलीट करा. तुमच्या मोबाईल फोन किंवा संगणकात अँटी व्हायरस, अँटी मालवेअर आहे कि नाही याची पडताळणी करा. नेहमी तुमच्या बँक खात्याशी निगडित कुठतेही अनोळखी सबस्क्रिपशन आले आहे का, याची माहिती घ्या. तसेच असे काही घडल्यास तत्काळ संबंधित गोष्टी बँकेच्या लक्षात आणून द्या.
महाराष्ट्र सायबर विभागाकडून या संदर्भात अधिक तपास केला जात आहे. विभागाच्या सूचनेनंतर अशा प्रकारचे मालवेअर असलेले 11 अॅप , गुगल प्ले-स्टोअरवरून काढून टाकण्यात आले आहेत.
हेही वाचा - देशभरात आढळले 37 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्येने गाठला 11 लाखांचा टप्पा