मुंबई: बुधवारी सकाळी शेअर बाजाराची थोडी सकारात्मक सुरवात झाली. कारण देशांतर्गत बाजारांनी बुधवारी नफ्याने सुरुवात केली. बीएसई सेन्सेक्स सुरुवातीला 250 अंकांनी वर होता. निफ्टी पण 17 हजाराच्यावर होता. बँक निफ्टीत मात्र तोटा पहायला मिळाला तर बाजार संमिश्र व्यवहार करताना पहायला मिळाला. रशिया-युक्रेन संघर्ष, तेलाच्या किमतीतील तीव्र चढ-उताराचा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे. सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा सेन्सेक्स 213.80 अंकांनी वाढून 56,676.95 वर होता आणि निफ्टी 57.00 अंकांनी वाढून 17,015.70 वर होता.
हेही वाचा : Today Petrol-Diesel Rates : महागाई पर्व! पेट्रोल-डिझेल दरात स्थिरता; वाचा आजचे दर