ETV Bharat / state

Drugs Seized : कांदिवली अंमली पदार्थ विरोधी विभागाची मोठी कारवाई

कांदिवली अंमली पदार्थ विरोधी विभागाची ( Kandivali Anti Narcotics Division ) मोठी कारवाई केली आहे. मुंबई कांदिवली अँटी-नॉर्कोटिक्स सेलने ( Kandivali Anti Narcotics Cell ) मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत तीन आरोपीना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 500 ग्रॅम चरस, 15 व्यावसायिक एलएसडी पेपरसह 25.8 ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज जप्त ( MDMA drugs seized ) करण्यात आले आहे.

Ddrugs Seized
कांदिवली अंमली पदार्थ विरोधी विभागाची मोठी कारवाई
author img

By

Published : Dec 30, 2022, 7:33 PM IST

कांदिवली अंमली पदार्थ विरोधी विभागाची मोठी कारवाई

मुंबई - नववर्षाच्या स्वागताच्या तयारीसाठी मुंबईतील मोठे मोठे हॉटेल्स सज्ज झाली असतानाच अँटी नार्कोटिक्स ट्रक्स वरील कारवाई तीव्र केली आहे. मुंबई कांदिवली अँटी-नॉर्कोटिक्स सेलने ( Kandivali Anti Narcotics Cell ) मुंबईतील तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत ड्रग्स बाळगणाऱ्या 3 आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे 500 ग्रॅम चरस आणि 15 व्यावसायिक एलएसडी पेपरसह 25.8 ग्रॅम एमडीएमए ड्रग्ज जप्त ( MDMA drugs seized ) करण्यात आले.

आरोपींना 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी - ज्याची एकूण किंमत सुमारे 23 लाख 92 हजार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एक बॉडीबिल्डर आहे. दुसरा आरोपी येस बँकेचा व्यवस्थापक आहे, तर तिसरा आरोपी ड्रग डीलर आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना 31 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) कालच मुंबईतील आंतरराज्य अंमली पदार्थ पुरवठा नेटवर्कचा पर्दाफाश करताना दोन जणांना अटक केली होती. हे नेटवर्क नवीन वर्षाच्या पार्ट्यांमध्ये बेकायदेशीर वापरासाठी मुंबईला ड्रग्ज पुरवत असल्याचा संशय होता.

चार किलो चरस जप्त - एनसीबीच्या पथकाने अटक केलेल्यांकडून चार किलो जप्त करण्यात आला होता. नोडल ड्रग कायदा अंमलबजावणी एजन्सीने हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधून औषधांच्या खरेदीसाठी कनेक्शन स्थापित केलेल्या नेटवर्कची माहिती देणाऱ्या इनपुटवर ही कारवाई केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.