मुंबई - गणेशोत्सव साजरा करताना जलशक्ती आणि जलस्त्रोताला प्रदूषणापासून मुक्त करण्यासाठी निर्माल्यासह प्लॅस्टिक जाणार नाही, याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यात स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी प्रबोधनासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले.
हेही वाचा - पवारांना सांगा पुन्हा युतीचेच सरकार येणार आहे; चंद्रकांत पाटलांचा टोला
महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संस्थेतर्फे आयोजित राज्य पुरस्कार वितरण कार्यक्रमात ॲड. शेलार बोलत होते. यावेळी सन २०१६-१७ साठी अहमदपूर, लातूरचे धुंडिराज लोहारे आणि सन २०१७-१८ साठी नांदेड येथील दिगंबर फुलारी यांना प्रा. बापूसाहेब टी. पी. महाले जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच स्काऊट गाईडस् अभ्यासक्रमातील राज्य पुरस्कार, स्काऊट गाईड प्रमाणपत्र, 'बार टू मेडल ऑफ मेरीट' या पुरस्काराचे वितरण यावेळी करण्यात आले.
हेही वाचा - अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करून यांचे तोंड बंदच - प्रियांका गांधी
ॲड. शेलार म्हणाले, स्काऊट गाईडमधून चांगले नागरिक निर्माण व्हावेत, यासाठी ही चळवळ आहे. ही चळवळ ध्येय ठेवून काम करीत आहे. आजचे पुरस्कार हे चांगल्या कामाची पावती आहे. देशसेवेसाठी करता येईल, ते करण्याची शपथ आपण या चळवळीमध्ये घेत असतो. देशप्रेम हे संस्कार आहेत. देशसेवा करण्यासाठी सैनिकाप्रमाणे सीमेवर जाणे आवश्यक नाही. स्काऊट गाईड हे देशात राहूनही सेवेचे व्रत पूर्ण करु शकतात.
हेही वाचा - बापरे..! धुळ्यात लस्सीमध्ये आढळली अळी, मालकाकडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
यावेळी स्काऊट गाईड राज्य संस्थेचे अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, मुख्य प्रशासक शरद उघडे, संतोष मानूरकर, कार्तिक मुंडे आदी उपस्थित होते. स्काऊट गाईड अभ्यासक्रमातील राज्य पुरस्कार हा राज्यस्तरावरील सर्वोच्च पुरस्कार आहे. राज्य पुरस्काराची चाचणी राज्यस्तरावर राज्य संघटन आयुक्त (स्काऊट) आणि राज्य संघटन आयुक्त (गाईड) यांच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात येते. सन 2016- 2017 आणि 2017-2018 या दोन वर्षात 3 हजार 881 स्काऊट आणि 3 हजार 396 गाईड यांनी यशस्वीपणे या चाचण्या पूर्ण केल्या आहेत.