ETV Bharat / state

मेट्रो - 2 साठी लागणारे सिसर क्रॉसओव्हर मुंबईत दाखल, कामाला मिळणार गती

author img

By

Published : Jun 28, 2020, 3:11 PM IST

हरियाणा येथील सोनिपतमधील मे. व्ही.ए.इ.-व्ही.के.एन. या भारतीय कंपनीने या सिसर क्रॉसओव्हरचे उत्पादन केले आहे. हे सिसर क्रॉसओव्हर मुंबईत दाखल झाल्याने मेट्रोच्या कामाला गती मिळणार आहे.

metro Scissors Cross-over came in mumbai
मेट्रो 2 अ साठी सिसर क्रॉसओव्हर दाखल

मुंबई- दहिसर ते डीएन नगर मेट्रो २ अ प्रकल्पातील आता आणखी एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. या प्रकल्पासाठीचे सिसर क्रॉसओव्हर शनिवारी साइटवर दाखल झाले आहेत. या सिसर क्रॉसओव्हरचा उपयोग मेट्रो गाड्यांचा मार्ग बदलण्यासाठी केला जातो. सिसर क्रॉसओव्हर ही एक विशिष्ठ पद्धतीची मार्ग रचना आहे. त्यानुसार हे सिसर क्रॉसओव्हर चारकोप मेट्रो आगार कडे जाणाऱ्या उताराच्या भागात लावण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने दिली आहे.

हरियाणा येथील सोनिपतमधील मे. व्ही.ए.इ.-व्ही.के.एन. या भारतीय कंपनीने या सिसर क्रॉसओव्हरचे उत्पादन केले आहे.तर या उत्पादनासाठी वापरण्यात आलेले रूळ हे वोइस्टलपाईन या ऑस्ट्रेलियन कंपनीकडून आयात केले गेले आहेत.

हे सिसर क्रॉसओव्हर आता साईटवर दाखल झाल्याने लवकरच ते लावण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. जुलैमध्ये हे रूळ लावण्याचे काम पूर्ण होईल. तर हे काम पूर्ण झाल्यानंतर बंगलोर वरून रस्त्या मार्गे आलेले आणि चारकोप आगारातील निश्चित केलेल्या प्लॅटफॉर्म वर उतरवलेले मेट्रोचे डब्बे हे स्टॅबलिंग लाईन च्या मदतीने हलवले जातील.

सिसर क्रॉसओव्हरच्या मदतीने मेट्रो गाड्या, स्टॅबलिंग लाईन, वर्कशॉप लाईन, तपासणी विभाग इत्यादी येते सुरळीतरित्या हलवता येतील.मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.