ETV Bharat / state

शाळा सुरू ! पण एकच अभ्यासक्रम तीन वेळा शिकवण्यासाठी कसरत; भाजप शिक्षक आघाडी आक्रमक - मुंबई शाळा सुरू

मुंबईसह राज्यातील शाळा सुरू झाल्या. परंतू शिक्षकांच्या अध्यापनाच्या तासिका किती असाव्यात याबाबत स्पष्ट सूचना नाहीत. त्यामुळे शिक्षकांना तीन वेळा अध्यापन करावे लागणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केले आहे.

mumbai
mumbai
author img

By

Published : Oct 5, 2021, 7:01 AM IST

मुंबई : कोरोना नियमांचे पालन करून कालपासून (4 ऑक्टोबर) मुंबईसह राज्यातील शाळा सुरू झाल्या. परंतू शिक्षकांच्या अध्यापनाच्या तासिका किती असाव्यात याबाबत स्पष्ट सूचना नाहीत. त्यामुळे शिक्षकांना तीन वेळा अध्यापन करावे लागणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शन सूचना निर्गमित करण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केले आहे.

शिक्षक संभ्रमात

याबाबत अनिल बोरनारे यांनी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाकडेही मागणी केली आहे. शाळा सुरू करण्याच्या संदर्भात केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार विद्यार्थ्यांना एकदिवसाआड शाळेमध्ये बोलवायचे आहे. वर्गातील निम्मे विद्यार्थी एकेदिवशी तर निम्मे विद्यार्थी दुसऱ्या दिवशी आणि जे विद्यार्थी दोन्ही दिवस हजर नसतील, त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. म्हणजे शिक्षकांना एकच भाग तीन वेळा शिकवावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांची खूपच दमछाक होणार आहे. तरी या संदर्भात संभ्रम आहे. तो त्वरीत दूर करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी शालेय शिक्षण विभागाकडे केली आहे.

कालपासून शाळा सुरू

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा कालपासून (4 ऑक्टोबर) पुन्हा एकदा जोमाने सुरू झाल्या आहेत. सुरुवातीला आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानंतर काही दिवसांनी परिस्थिती पाहून बाकीचे वर्ग देखील चालू करण्यात येणार आहेत. काल अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. मुलुंड येथील महानगरपालिकेच्या शाळेत देखील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसत होता. कारण की ऑनलाईन अभ्यास विद्यार्थ्यांना जमत नव्हता. छोटे असलेले घर, ऑनलाईनसाठी लागणारी सामग्री नसल्यामुळे होणारा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत होता. मात्र शाळा सुरू झाल्याने या विद्यार्थ्यांना आनंद झाल्याचे दिसत आहे. पुण्यातही विद्यार्थ्यांचे औक्षण करून, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात
आले.

मुंबई महापौरांचा विद्यार्थ्यांशी संवाद

राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार आटोक्यात आल्याने आजपासून शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. मुंबईमध्येही आजपासून ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. पालकांनी संमतीपत्र सादर केल्यानंतरच मुलांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले.

मुंख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही विद्यार्थ्यी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी लाईव्ह साधला संवाद

हेही वाचा - व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम सोशल मिडिया प्लॅटफॉर्म अचानक बंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.