मुंबई - कोरोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत.
हेही वाचा -COVID 19 : 'आदेश न पाळल्यास कठोर कारवाई केली जाईल'
नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये दि. 31 मार्च 2020 पर्यंत बंद राहतील असे आदेश दिले आहेत. शासन निर्देशानुसार या कालावधीत असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा परीक्षाविहित वेळापत्रकानुसार घेण्यात येतील. या कालावधीत आजारी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे.
हेही वाचा -कोरोना विषाणू : गृह मंत्रालयाकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाखांची मदत