ETV Bharat / state

'कहाँ गए वो २० लाख करोड?' या प्रश्नाची मोदींना भीती का वाटते?: सत्यजीत तांबे

author img

By

Published : Aug 14, 2020, 7:36 PM IST

मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन केले. सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून 10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत हे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.

Satyajeet Tambe
सत्यजीत तांबे

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यव्यापी आंदोलन केले. या आंदोलनाचा आज शेवटचा दिवस असल्याने मुंबईतील भाजपा कार्यालयासमोर आंदोलन केले गेले. या आंदोलनाला जात असताना पोलिसांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि सहकाऱ्यांना ताब्यात घेतले. 'कहाँ गये वो 20 लाख करोड?' या प्रश्नाची भाजपा आणि नरेंद्र मोदींना भीती का वाटते? असा प्रश्न सत्यजीत तांबे यांनी यावेळी उपस्थित केला.

आंदोलनाला जात असताना पोलिसांनी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे आणि सहकाऱ्यांना ताब्यात घेतले

मुंबईतील या आंदोलनात तांबे यांच्याबरोबर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, विधी विभागाच्या समन्वयक करीना झेविअर आणि प्रवक्ते आनंद सिंह हेही सहभागी झाले होते. सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून झालेल्या या राज्यव्यापी आंदोलनात 10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी गावोगावी, शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना या 20 लाख कोटींच्या पॅकेजचा काही लाभ मिळाला की नाही याची माहिती घेतली. तसेच लघु, छोटे व मध्यम उद्योग क्षेत्रातील व्यापारी, दुकाने, कारखान्यांमध्ये जाऊन त्यांच्याशीही संवाद साधला. मोदींच्या दाव्यांची वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतले. नोकरदार व बेरोजगार युवकांनाही या पॅकेजबद्दल विचारले मात्र, कोणत्याच घटकाला या पॅकेजमधून काहीही मिळालेले नाही. विविध घटकांशी संवाद साधून युवक काँग्रेसने या पॅकेजची पोलखोल केली. तसेच फोन व पत्राद्वारे सरकारला जाब विचारला.

या आंदोलनाला जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला. 10 ऑगस्टपासून 4 दिवस शेतकरी, उद्योजक, बेरोजगार, नोकरदारांशी केलेल्या संवादानंतर आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी युवक काँग्रेसने राज्यातील सर्व भाजपा कार्यालये व खासदारांच्या घरासमोर जाऊन त्यांनाच 20 लाख करोड नक्की कुठे गेले, अशी विचारणा केली. या आंदोलनावेळी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सिंगसह इतर सर्व अटी व नियमांचेही पालन केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.