मुंबई : सारेगमप लिटल चॅम्प्स ज्ञानेश्वरी गाडगे हिने आज शिवतीर्थ येथे जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांची भेट घेऊन आशिर्वाद घेतले. मंगळवारी ती शिवतीर्थावर राज ठाकरे यांना भेटण्यासाठी सहकुटुंब आली होती. यावेळी राज ठाकरे आणि शर्मिलाताई यांनी तिला सदिच्छा आशीर्वाद देखील दिला आहे.
गायनाची प्रेक्षकांना चांगलीच भुरळ : टीव्हीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमातील मराठमोळ्या मुलींनी देशभरातील प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. ज्ञानेश्वरीने तिच्या गायनाने आणि गोड आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. तर कार्तिकीने वाजवलेल्या हार्मोनियमला परीक्षकांची चांगलीच दाद मिळाली आहे. १५ ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमातील या दोघींचे व्हिडीओ सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’चे परीक्षक शंकर महादेवन आणि अनु मलिक यांच्याकडून ज्ञानेश्वरीच्या कलेचे कौतुक केले जात आहे.
ज्ञानेश्वरीच्या गायनाचे होतंय कौतूक : ज्ञानेश्वरीचे वडील गणेश घाडगे रिक्षा चालवितात. ठाण्यामध्ये तिचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या कार्यक्रमाच्या ऑडिशनसाठी ज्ञानेश्वरी शालेय गणवेशातच पोहोचली होती. तिच्या या ऑडिशनचा व्हिडीओ इंटरनेटवर बराच व्हायरल झाला होता. या ऑडिशनमध्ये ज्ञानेश्वरीने गायलेल्या शास्त्रीय गाण्याने परीक्षकांसह प्रेक्षक अवाक झाले होते. यावेळी परीक्षकांकडून सुवर्णपदकानं तिचा गौरव करण्यात आला होता.
राज ठाकरे शर्मिला ठाकरेंकडून कौतूक: ज्ञानेश्वरी हिने शर्मिला ठाकरे यांना गाणे गाऊन दाखवले. त्यावेळी ठाकरे पती पत्नी यांनी तिच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली. तिला सांगितले की,'असेच गाण्यांमध्ये अजून बरीच पुढची मजल मारायची आहे. गाणे गात जा रियाज करत जा. घराचे आणि राज्याचे नाव मोठे कर. तिच्या पुढील वाटचालीस तुला सदिच्छा. यासंदर्भात मनसचे नेते संदीप देशपांडे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,'ही सारेगममधील बालकलाकार आहेत. सध्या तिच्या गाण्यामुळे ती महाराष्ट्राला माहिती झालेली आहे. तिच्या कुटुंबाने राज ठाकरे यांची भेट घेतली आणि राज ठाकरे आणि शर्मिलाताई यांनी तिला सदिच्छा आशीर्वाद देखील दिले आहेत.
राज ठाकरे होणार परळी कोर्टात हजर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना परळीच्या कोर्टाने समन्स बजावले होते. त्यामुळे आज ते कोर्टात सुनावणीसाठी हजर राहणार आहेत. 2008 मध्ये राज ठाकरे यांना अटकेच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी परळी गंगाखेड परिसरात निषेध व्यक्त केला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. त्यानंतर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात पूर्वी देखील राज ठाकरे यांना दोन वेळा वॉरंट जारी करण्यात आले होते.
हेही वाचा : Pallavi Joshi injured : द व्हॅक्सिन वॉरच्या सेटवर काश्मीर फाइल्स अभिनेत्री पल्लवी जोशी जखमी