ETV Bharat / state

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत हे मोदींच्या चरणी लीन होतील, संजय शिरसाठ यांचा ठाकरे गटाला टोला

Sanjay Shirsat On Sanjay Raut : रविवारी चार राज्यातील निवडणुकात भाजपाला चांगले यश मिळाले. यामुळं लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा आत्मविश्वास दुणावला आहे. यावर राज्यातील भाजपा नेत्यांनी विरोधकांवर टीका करत असताना, आज माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाचे अभिनंदन केलं. मात्र जर हिम्मत असेल तर मुंबई पालिका निवडणुका घेऊन दाखवा, असं आव्हान दिलं आहे. यावर भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांनी राऊतांवर जोरदार पलटवार केला आहे.

Sanjay Shirsat News
संजय शिरसाट
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 9:02 PM IST

प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट

मुंबई Sanjay Shirsat On Sanjay Raut : तीन राज्यात काँग्रेसचा झालेला पराभव काँग्रेसच्या जेवढा जिव्हारी लागला नसेल, तेवढा तो संजय राऊत यांच्या जिव्हारी लागला आहे. लोकशाहीने जो निर्णय दिला आहे, तो मान्य करा, उगाच कशाला काहीही घोटाळा झाला असं बोलत आहात, संजय राऊत बोलतात EVM मध्ये घोटाळा झाला. मग कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकून आले, तेव्हा EVM मध्ये घोटाळा झाला नव्हता का? असा सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केलाय. आता संजय राऊत रडत आहेत. आता त्यांना दुःख व्यक्त करण्यासाठी काही नाही. म्हणून हे माध्यमातून आपलं दुःख व्यक्त करत आहेत, असा टोला संजय शिरसाठ यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) लगावला आहे.

मोदींच्या चरणी लीन होतील : पुढे बोलताना शिरसाठ म्हणाले की, यांना (ठाकरे गटाला) कुठल्याच निवडणुकीत यश मिळाले नाही. जिल्हा परिषद असो ग्रामपंचायत, हे पिछाडीवर पडले आहेत. आता बोलत आहेत की, महानगरपालिका निवडणुका घ्या. आता यांचे अस्तित्व शून्य झाले आहे. त्यामुळे हे काहीही बोलत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कदाचित खरंतर हे मोदींच्या चरणी लीन होतील.

आता बोलण्यात काही अर्थ नाही : आज भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, 2024 साली देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री होतील. यावर बोलताना शिरसाठ म्हणाले की, ते भाजपाचे पक्षश्रेष्ठी आहेत. वातावरण निर्मितीसाठी असे बोलावे लागते. पण हे आता बोलून काही फायदा नाही. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरेल. प्रत्येक पक्षाला वाटत असते आणि कार्यकर्त्यांची सुद्धा भावना असते की, आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा, पण हे आता बोलून त्याला काही अर्थ नाही, निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण हे ठरेल, असं संजय शिरसाठ म्हणाले.

एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील : चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी विरोधकांना मौका मिळेल अशी वक्तव्य करू नये, असा सल्ला दिल्याने युतीत धुसफूस सुरु असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. २०२४ च्या निवडणुकानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असं विधान बावनकुळे यांनी केलं होतं. त्याचा संदर्भ देत शिरसाठ यांनी बावनकुळे यांना सल्ला दिला आहे. आपण आपल्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी विधाने जरूर करा, परंतु त्यामुळे विरोधकांना टिकास्त्र सोडण्यासाठी मौका मिळेल अशी विधाने करू नये. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री (Eknath Shinde) राहतील असा विश्वास देखील शिरसाठ यांनी वक्तव्य केला.

हेही वाचा -

  1. Sanjay Shirsat On Congress : काही दिवसांतच काँग्रेस फुटणार; शिवसेना आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
  2. बाळासाहेब तुमची प्रॉपर्टी नाही, ते शिवसैनिकांचे दैवत; आमदार शिरसाठ यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
  3. MLA Sanjay Shirsath Letter : 'मुख्यमंत्री साहेब..! आम्हाला अशी अवमानास्पद वागणूक का दिली?'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.