मुंबई : राज्यपाल हे शिवाजी महाराजांचा अपमान करत आहेत. शिवरायांनी कधी पाचवेळा माफी मागितली हे मुख्यमंत्र्यांनी ( Sanjay Raut slammed Shinde group ) जाहीर करावेत. कारण ते सहयोगी आहेत. राज्यपाल कोश्यारींची वक्तव्य दळभद्री आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, की राज्यपालांच्या वक्तव्याने महाराष्ट्राचा ( Sanjay Raut demand reignition of CM ) स्वाभिमान दुखावला आहे. शिवरायांचा अपमान करून ७२ तास उलटले तरी मुख्यमंत्र्यांनी व ४० माणसांनी एकही शब्द काढला ( Sanjay Raut on shivaji controversial statement ) नाही. त्यांनी राजीनामा द्यायला हवा. शिवरायांना माफीवीर म्हटले तरी गप्प आहेत, महाराष्ट्र तुमच्यावर थुंकत आहे. एका वर्षात राज्यपालांनी चारवेळा अपमान केला आहे. शिवरायांचा अपमान भाजपच करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.