ETV Bharat / state

पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेने साधला 'निशाणा' - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

'महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही.'  हे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यांचे हे ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी री ट्वीट केले आहे.

पवारांच्या खांद्यावरून बंदूक ठेवून शिवसेने साधला 'निशाणा'
author img

By

Published : Sep 26, 2019, 6:09 PM IST

Updated : Sep 26, 2019, 6:55 PM IST

मुंबई- शरद पवारांविरोधात ईडीकडून तक्रार दाखल झाल्यानंतर पवार भलतेच आक्रमक झाले होते. त्यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यात त्यांनी 'मी महात्मा फुले-शाहू-आंबेडकर यांच्यावर आस्था ठेवणारा व्यक्ती आहे. संविधानाबाबत मला आदर आहे. त्यामुळे मी तपासाला सहकार्य करणार. पण एक सांगतो, हा महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही.' त्यांच्या वक्तव्याचा शिवसेनेने योग्य पद्धतीने वापर करत भाजपवर निशाणा साधला आहे.

'महाराष्ट्र शिवबांचा महाराष्ट्र आहे. दिल्लीच्या तख्तासमोर झुकण्याचा संस्कार या महाराष्ट्राला शिकवलेला नाही.' हे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यांचे हे ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी री ट्वीट केले आहे. सध्या शिवसेना आणि भाजप यांच्या जागा वाटपाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर हे री ट्वीट बरेच काही सांगून जाते. राऊत यांनी पवारांचे ट्वीट री ट्वीट करून एक प्रकारे भाजपलाच सुचक इशारा दिला आहे.

शिवसेना कोणत्याही स्थितीत भाजप समोर झुकणार नाही हेच त्यांना यातून सांगायचे आहे. भाजप शिवसेनेला १०० ते ११० जागा देण्याची तयारी दर्शवत आहे. पण शिवसेनेला तेवढ्या जागा मान्य नाहीत. सत्तेत समसमान वाटा हे सुत्र लोकसभेलाच ठरले आहे, असे राऊत वारंवार सांगत आले आहे. शिवाय आदित्य ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहे हे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शिवसेना अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहे. त्यात पवारांचे ट्वीट रि ट्वीट करून योग्य तो संदेश राऊत यांनी भाजपला दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Intro:Body:

1 sena pawar.jpg

Conclusion:
Last Updated : Sep 26, 2019, 6:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.