ETV Bharat / state

जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत अडचण नाही - संजय राऊत - Lok Sabha Election

Sanjay Raut On Lok Sabha : लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणतीच अडचण नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. सत्ता तिकडे विखे पाटील (Vikhe Patil) हे समीकरण असल्यामुळं विखे पाटील भविष्यात कुठे असतील हे सांगता येणार नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांनी त्यांना लगावला.

Sanjay Raut Reaction
खासदार संजय राऊत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 4:10 PM IST

प्रतिक्रिया देताना खासदार संजय राऊत

मुंबई Sanjay Raut On Lok Sabha : मालवाहतूक करणाऱ्या गाड्या आणि ट्रक यांनी हिट अँड रन कायद्याबाबत (Hit And Run Law) निषेध व्यक्त करीत संप पुकारला आहे. यामुळं सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झालेला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांवर हल्ले होत आहेत. या संदर्भात राज्य सरकारने तातडीने पावलं उचलावीत. महाराष्ट्रमध्येच नाही तर संपूर्ण देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने, राज्यातील नेत्यांनी आता केंद्रातील नेत्यांची चर्चा करावी. जी परिस्थिती राज्यात उद्भवली आहे ती अहमदपुर येथील प्रकाराने चिघळत गेली. त्यामुळं सामान्य माणसाला त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचं संजय राऊत म्हणाले.

जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा : आगामी लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) संदर्भात महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. कोणत्याही पद्धतीची अडचण येत नाही. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अतिशय उत्तम संवाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाबाबत कोणतीही अडचण नाही. गरज पडल्यास आपण दिल्लीत जाऊन चर्चा करायला तयार आहोत, असं राऊत यांनी स्पष्ट केलंय.

तेव्हा विखे पाटील कुठे असणार ? : "राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी आतापर्यंत अनेक पक्ष बदलले आहेत. त्यांचं अख्खं आयुष्य काँग्रेसमध्ये गेलं आहे. त्यानंतर ते शिवसेनेमध्ये आले आणि आता भाजपात गेले. त्यामुळं त्यांच्यावर आम्ही काय बोलणार? भाजपामध्ये आता कोण येतं आणि कोण जातं हे येणारा काळच ठरवेल. जेव्हा भारतीय जनता पार्टीकडे सत्ता नसेल तेव्हा विखे पाटील कुठे असणार आहेत याचा त्यांनी विचार केला पाहिजे," असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर प्रचाराबाबत त्यांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. त्यांच्याकडं सर्व साधने आहेत ते कुठूनही प्रचार करू शकतात. ते चांद्रयान घेऊन दक्षिण ध्रुवावर जातील कुठेही जातील अमर्याद सत्ता त्यांच्या हातात आहे, त्यांना कोण अडवणार, असा उपरोधिक टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा -

  1. 'त्या' डॉक्टर महिलेसोबतचे फोटो दाखवायचे का? नितेश राणेंचा संजय राऊतांबाबत मोठा खुलासा
  2. 'सलीम कुत्तासोबतची पार्टी भाजपानं आयोजित केली'; संजय राऊतांचा नवा खुलासा
  3. भाजपानं राम मंदिराचं मंगल कार्यालय करुन ठेवलंय; संजय राऊतांचा घणाघात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.