मुंबई Sanjay Raut Reaction : देशातील चार राज्यातील म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा येथील निवडणुकांचा निकाल आज लागला. यातील तीन राज्यात भाजपाला चांगले यश मिळालं आहे. तर तेलंगणा येथे काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असताना, आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( (Sanjay Raut On Assembly Elections Result) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. निकालानंतर आज माध्यमांशी संवाद साधताना, राऊत यांनी मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची निवडणुकित मेहनत नाकारता येणार नाही. यांनी येथे चांगला प्रचार केला. पण जनतेचा मताला लोकशाहीत महत्त्व आहे. मोदी-शहा यांच्याबरोबर तपास यंत्रणांचे देखील अभिनंदन केलं पाहिजे, असा टोला देखील राऊत यांनी भाजपाला लगावला.
संपूर्ण केंद्रीय मंडळ प्रचारात उतरले : राजस्थानमध्ये पाच वर्षांनी कायम बदल होत असतो, जेव्हा भाजपचे सरकार होतं त्यानंतर काँग्रेसचे सरकार आले. काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी उत्तम काम केलं. राजस्थानमध्ये सरकार बदलण्याची परंपरा ही तिथल्या जनतेची मानसिकता आहे. तसेच विरोधकांची जी साधनं आहेत. ती अपुरी पडली. निवडणुका ह्या युद्धासारख्या भाजपाने लढल्या आहेत. या निवडणुकांत भाजपाने संपूर्ण केंद्रीय मंडळ, केंद्र सरकार उतरवले होते. ऐन मतदानाच्या दिवशी देखील विरोधकांवर तपास यंत्रणांच्या धाडी पडत होत्या. त्यामुळं भाजपाने ह्या निवडणुका जिंकल्या. पण शेवटी लोकांचा कौल महत्त्वाचा असतो, असं संजय राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीवर परिणाम नाही : आज लागलेल्या निकालाचा परिणाम 2024च्या निवडणुकांवर होणार नाही. तसेच इंडिया आघाडीवर होणार नाही. आम्ही मजबूत आहोत आणि मजबूत राहू. ६ डिसेंबरला मल्लिकार्जून खर्गे यांचा निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. यात आम्ही कोठे चुकलं याचा आढावा घेऊ. इंडिया आघाडीला मजबूत करण्यासाठी आणि आघाडीतल्या समन्वयाच्या बाबतीत देशभरामध्ये नव्याने विचार करण्याची गरज आहे. काय सुधारणा केल्या पाहिजे, काय धडा घेतला पाहिजे यावर बैठकीत विचार केला जाईल, असं राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीची बैठक होणार : ६ डिसेंबरला मल्लिकार्जून खर्गे यांचा निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. यात आमचं काय चुकलं याचा आढावा घेऊ. इंडिया आघाडीला मजबूत करण्यासाठी आणि आघाडीतल्या समन्वयाच्या बाबतीत देशभरामध्ये नव्याने विचार करण्याची गरज आहे. काय सुधारणा केला पाहिजे, काय धडा घेतला पाहिजे यावर बैठकीत विचार केला जाईल, असं राऊत म्हणाले.
हेही वाचा -