मुंबई : महाविकास आघाडीकडून काल मुंबईत महामोर्चाचे ( MVA Mahamorcha ) आयोजन करण्यात आले होते. या महामोर्चावरून नवीन वाद पेटत असताना खासदार संजय राऊत यांनी दुसरे ट्विट करून सारवासरव करण्याचा प्रयत्न केला आहे. "मराठा मोर्चा देखील महाराष्ट्र स्वाभिमान. न्याय्य हक्कांसाठी निघाला. शिवरायांचा जयघोष करीत त्याच मार्गावरून त्याच ताकतीने निघाला. तेव्हा देखील आजच्या प्रमाणे विराट मोर्चाची चेष्टा दबक्या आवाजात हेच लोक करीत होते. दोन्ही मोर्चे महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारे होते. तूर्त इतकेच!" असे ट्विट संजय राऊत ( Sanjay Raut on Mahamorcha ) यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्र्यांची मोर्चावरून टीका : महाविकास आघाडीचा निघालेला हल्लाबोल मोर्चा म्हणजे नॅनो मोर्चा होता सात पक्ष एकत्र मिळून वीस पंचवीस हजार कार्यकर्ते देखील जमवू शकले नाहीत, असा चिमटा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis Critics on Mahamorha ) यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चाबाबत काढले होते. तसेच जो व्हिडिओ संजय राऊत यांनी ट्विट केला. तो मराठा क्रांती मोर्चाचा आहे अशी आपल्याला माहिती मिळाली आहे, असे विधान उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केले आहे.
संजय राऊतांचे प्रत्युत्तर : संजय राऊत यांनी व्हिडिओ ट्विट करत "देवेंद्र फडणवीस ज्यास नॅनो मोर्चा म्हणून हिणवत आहेत तो हाच! महाराष्ट्र प्रेमी जनतेचा बुलंद आवाज. देवेंद्र जी. हे वागणे बरे नाही.जय महाराष्ट्र!" असा पहिलं ट्विट केलं होतं. त्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना चिमटा काढला.