मुंबई - या सर्व गोष्टी 2024 मध्ये बोला. तुम्ही सत्तेत नसणार. तुमच्या डोक्यात घाणेरडे कीडे भाजपनं टाकले आहेत. कालचे भाषण सर्व भाजपाला मजबूत करण्यावर होते. काल भाड्याचे लोक आले होते. भाजपाने पाठवले होते, अशी बोचरी टीका खासदार संजय राऊत यांनी केली. ते मुंबईत आपल्या निवासस्थानी बोलत होते.
मंगळवारी राज्यात चार दसरा मेळावा झाले. तर देशभरात अनेक ठिकाणी मिरवणूका काढण्यात आल्या आहेत. असाच एक मेळावा दिल्लीतील द्वारका येथे घेण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'आपल्याला जातीवादाचा, धार्मिक तेढ निर्माण करणारा आणि लोकांमध्ये फूट पाडणारा रावण जाळायचा आहे' असं आपल्या भाषणात म्हटलं. यावरूनदेखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला.
या देशांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून जातीयवाद, धर्मवाद, क्षेत्र वाद याला खतपाणी घालून राजकारण करायचे आणि निवडणुका लढवायच्या हे काम कोण करतोय? हे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करत आहे. हे स्वतः हमास आहेत. त्यांच्या डोक्यात हमास आणि धमास भरलेला आहे-खासदार संजय राऊत
खोटी शपथ घेण्याचे काम- मराठा आरक्षणा संदर्भात उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला होता. त्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. सरकारनं मराठा आरक्षणासंदर्भात ठोस पावलं न उचलल्यास जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, आरक्षण द्यावे लागणार, अन्यथा जनता भडकेल. भारतीय जनता पक्षाच्या सहवासात आल्यापासून खोटी शपथ घेण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करत आहेत.
डोक्यावरती काळी टोपी घालून फिरतील- त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम करत आहेत. महाराष्ट्रातील भक्कम तडा देण्याचे काम करत आहेत. हे भारतीय जनता पक्षाच्या इशाऱ्यावर चालत आहेत. यांना स्वतःचा आचार-विचार नाही. जे भाजपा सांगते, ते हे करत आहेत. काही दिवसांनी हे डोक्यावरती काळी टोपी घालून फिरतील. रक्ताचा शेवटचा थेंब आणि श्वास असेपर्यंत ते शिवसेनेत राहणार होते. ते आता शिवसेनेत राहिले का नाही? भाजपा जनता पक्ष आमच्यावरती छळ करतो, म्हणून जाहीर सभेत राजीनामा देणारे हे आज भाजपाच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.
हेही वाचा-