ETV Bharat / state

Sanjay Raut : तपास यंत्रणांकडून चुकीची कारवाई, भविष्यात त्यांच्यावर कारवाई होईल​ - संजय राऊत - Sanjay Raut Meet Anil Deshmukh

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांची भेट ( Sanjay Raut Meet Anil Deshmukh ) घेतली. मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजप आमि केंद्रिय तपास यंत्रणांवर टीका ( Criticize Central Investigation agencies ) केली. भविष्यात या तपास यंत्रणांवर कारवाई होईल असे त्यांनी म्हटले.

sanjay raut
संजय राऊत
author img

By

Published : Dec 30, 2022, 6:27 PM IST

मुंबई : कथित गैरव्यवहार प्रकरणी जेल​​मधून सुटलेल्या अनिल देशमुख यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज भेट ( ​​Sanjay Raut Meet Anil Deshmukh ) घेतली. दरम्यान, दोघांनी ही जेलमध्ये आलेल्या अनुभवांचे कथन केले. केंद्रीय तपास यंत्रणांकडून चुकीची कारवाई करण्यात आली. मात्र, ज्या पध्दतीने या यंत्रणांनी राजकीय सूत्रधार म्हणून काम केले, त्यांच्यावर भविष्यात कारवाई होईल​, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त ( Action Will Be Taken Against Them ) केला. मुंबईत ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये : आज अनिल देशमुखांना भेटायला आलो, कारण ते ज्या संकटातून गेले त्यातून मी सुद्धा गेलो आहे. अशा वेळी आपल्या कुटुंबाची काय भावना असते, हे मला माहिती आहे​.​ असा प्रसंग शत्रूवरही येऊ नये, अशी आमची इच्छा आहे. राज्याची सत्ता अडीच वर्ष आमच्या हातात होती. युपीएच्या काळात ही आम्ही सत्ता जवळून बघितली. मात्र, आम्ही कधी आमच्या शत्रूशीही इतक्या अमानुषपणे वागलो नव्हतो. याला लोकशाही म्हणत नाही”, असेही ते ( Criticize Central Investigation agencies ) म्हणाले.

तपास यंत्रणांबाबत निरीक्षणे फार गंभीर : आपल्या देशामधील न्याय व्यवस्थेत अजूनही असे रामशास्त्री आहेत, की ज्यांच्यामुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवावा वाटतो. एक तरी स्तंभ या देशाचा मजबूत आहे, याची खात्री पटते. अनिल देशमुख यांना जामीन देताना 'सीबीआय' आणि 'ईडी'वर दोन्ही वेळेला उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची तपास यंत्रणांबाबत निरीक्षणे फार गंभीर आहेत. माझ्या बाबतीत सुद्धा ईडीच्या कोर्टाने नोंदवलेली निरीक्षणे सुद्धा अत्यंत गंभीर आहेत. न्यायालय हे खोटे आहे, चुकीचे आहे हे स्वीकारते. अशावेळेला ज्या तपास यंत्रणांनी चुकीच्या कारवाया केल्या, राजकीय सूत्रधार म्हणून ज्यांनी काम केले, त्यांच्यावर भविष्यात कारवाई होईल का? मी खात्रीने सांगतो होईल, असे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्याकडून कानपिचक्या : देशात लागू असेलला मनी लॉंडरिंगचा कायदा दशहतवाद्यांस मदत करणाऱ्या, दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या लोकांना रोखण्यासाठी, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी निर्माण झाला आहे. आमच्यासारखे राष्ट्रभक्त कोणाला दहशतवादी वाटत असतील. तर संविधानातल्या अनेक व्याख्या बदलाव्या लागतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ठाकरे गटाच्या युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर भाजप आमदार योगेश सागर यांनी केलेल्या आरोपांवरही संजय राऊत यांनी भाष्य केले. सागर यांनी विषय समजून घ्यावा आणि मग अशा तरुण नेत्यावर आरोप करावेत, ​अशा शब्दांत कानपिचक्या दिल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.