ETV Bharat / state

Maharashtra Politics: शिवसेनेतील बंडाची धग कायम...राष्ट्रवादी, ठाकरे गट व शिंदे गटाकडून वेगवेगळे दिन साजरे

शिवसेनेतील बंड होऊन वर्ष उलटले तरी त्याचा राज्याच्या राजकारणावरील प्रभाव कायम राहिलेला आहे. ठाकरे गट आज खोके दिन, राष्ट्रवादीकडून गद्दार दिन तर शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन साजरा केला जात आहे

author img

By

Published : Jun 20, 2023, 9:51 AM IST

Updated : Jun 20, 2023, 12:05 PM IST

Maharashtra Politics
राष्ट्रवादी, ठाकरे गट व शिंदे गट करणार वेगवेगळे दिन साजरे

मुंबई : शिवसेनेतील बंडानंतर महाविकास आघाडीची सत्ता संपुष्टात आली. याच दिवसाची आठवण म्हणून ठाकरे गटाकडून आज खोके दिन म्हणून साजरा केला जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहित आज जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा करावा, असे पत्र लिहिले आहे. हे पत्र त्यांनी ट्विट केले आहे. दुसरीकडे ठाकरे गटाला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गटाकडून स्वाभिमान दिन साजरा केला जाणार आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून आज गद्दार दिन साजरा केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारांच्या सुरत गोवा व्हाया गुवाहाटी दौऱ्याला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. राज्यसभेचे मतदान झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी सुरत मार्गे गुवाहातीला पलायन केले. त्यानंतर जे काही झाले ते आपल्या सर्वांसमोर आहे. एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केलेल्या या ऐतिहासिक बंडखोरीला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. या निमित्ताने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युनायटेड नेशनला पत्र लिहिले आहे. यात त्यांनी 20 जून हा आंतरराष्ट्रीय गद्दार दिवस साजरा करण्याची मागणी केली आहे.

गद्दारांना जोडे मारले पाहिजेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंद व इतर विषयांसंदर्भात खासदार संजय राऊत यांनी आपल्या निवास्थानी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, आता योगा डे साजरा केला जाईल. यासह अनेक दिवस साजरे करण्यासंदर्भात युनायटेड नेशन निर्णय घेत असते. या जगामध्ये युनायटेड नेशनच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे दिवस साजरे केले जातात. 20 जून हा देशातल्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस आहे. आईसारख्या शिवसेनेच्या पोटात खंजीर खुपसून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात चाळीस आमदारांनी ज्या प्रकारची बेईमानी केली. त्यावरून एकतर या दिवशी गद्दारांना जोडे मारले पाहिजेत.

नुसते डोळे वटारले ईडीने आणि शिंदे पळून गेले- पुढे बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अंतराष्ट्रिय योगा डेसाठी प्रयत्न केले होते. पंतप्रधानांनी या जागतिक गद्दार दिनासाठी देखील प्रयत्न करावे, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली आहे. दुसरीकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी सरकारने SIT ची स्थापना केली आहे. या विशेष पथकाने आपले काम सुरू केले असून पालिकेच्या विविध अधिकारी व माजी नगरसेवकांना नोटिसा पाठवल्या आहेत. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना नुसते डोळे वटारले ईडीने आणि ते पळून गेले. कुठल्या नोटीसची गोष्ट करताय? त्यांच्या माणसाला कोण उचलून घेऊन गेले हे बघा आधी. आम्हाला नोटीस आले आम्ही बेडरपणे तुरुंगात गेलो. आम्ही गद्दारी केली नाही. आम्ही सर्व काही भोगले. आम्ही तुरुंगवास भोगला. संघर्ष केला. तुमच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे आहोत का? सचिन जोशी यांना का उचलले, हे आधी ईडीला विचारा?" असा सवाल देखील राऊत यांनी विचारला आहे.

अंबादास दानवे यांनी कोश्यारी यांना लिहिले पत्र- विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत पत्र लिहिले. त्यांनी पत्रात म्हटले, की दिल्लीतील पातशहाच्या मार्गदर्शनाखाली माजी राज्यपालांनी बाळासाहेंबाची शिवसेना फोडण्याचे पाप केले. 40 आमदारांनी केलेल्या गद्दारीची 33 देशांनी दखल घेतली. त्यामुळे 20 जूनला जागतिक गद्दार दिन साजरा करण्यास युनोला पत्रव्यवहार करावा, असे पत्रात म्हटले आहे. कोश्यारींच्या वाढदिवशीच दानवेंनी पत्र लिहिल्याने त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

काय म्हटले आहे पत्रात: महाविकास आघाडी सरकार असताना, जाणीवपूर्वक तत्कालीन सरकारला कोश्यारींनी त्रास दिला. सतत सरकार अडचणीत येईल, अशी भूमिका बजावली. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या तिकीटवर निवडून आलेल्या 40 आमदारांनी 20 जून 2022 रोजी बंडखोरी केली. राज्यपाल म्हणून कोश्यारींनी त्याला आवर घालण्याऐवजी खतपाणी घातले. सूर्याजी पिसाळ - खंडूजी खोपडे यांच्या गद्दारीनंतर महाराष्ट्रावर त्यानंतर गद्दारी शिक्का बसला. या गद्दारीचे सध्या पीक फोफावत आहे. माजी राज्यपाल कोश्यारींची यासाठी प्रचंड मेहनत आहे. शिवसेना प्रमुखांची शिवसेना फोडण्याचे पाप गद्दारींनी केले. 33 देशांनी या गद्दारीची दखल घेतली, असा दावा करण्यात आला. 33 देश दखल घेणार असतील या जागतिक गद्दार दिन म्हणून साजरा होवू शकतो. हा दिवस साजरा व्हावा, यासाठी दिल्लीच्या पातशहांच्या मार्फत युनोकडे प्रत्न करावेत, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

दोन्ही गटातील वाद टोकाला: ठाकरे गटाकडून खोके दिन साजरा केला जाणार असताना पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांनी ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांना नोटीस पाठविल्याचे बोलले जात आहे. खोके दिन साजरा केला तर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. शिंदे गट व ठाकरे गटाकडून शिवसेनेचा वर्धापन दिन दोन भिन्न ठिकाणी साजरा करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. अमेरिकेत जाता, पण मणिपूरमध्ये तुमचा सुर्य उगवत नाही, अशी टीका केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही कधी मालवणमध्ये तरी गेलात का असा टोला ठाकरेंना लगावला.

हेही वाचा-

  1. Shivsena Anniversary : 'तुम्हीच गद्दारी केली, फक्त तारीख विसरलात', एकनाथ शिंदेची उद्धव ठाकरेंवर जळजळीत टीका
  2. Shivsena UBT anniversary : 'इथे गर्दी तर तिथे गारदी' उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका, भाजपची राज्य करण्याची लायकी नसल्याचा घणाघात

Last Updated : Jun 20, 2023, 12:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.