ETV Bharat / state

Sanjay Raut Letter To Fadnavis: महाराष्ट्रात काय सुरू आहे? राऊतांचे फडणवीसांना पत्र - रिफायनरी प्रकल्पासाठी पत्रकाराची हत्या

गृहमंत्री महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? असा थेट सवाल करणारे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला आहे.

Sanjay Raut on Devendra Fadnavis
महाराष्ट्रात काय सुरू आहे
author img

By

Published : Feb 11, 2023, 10:11 AM IST

मुंबई : राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे गृहमंत्र्यांचे आपण लक्ष वळवू इच्छित आहोत. प्रशासनाचा चांगला अनुभव देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. गृहखाते देखील त्यांनी याआधी सांभाळले आहे. तरी देखील राज्यात दिवसाढवळ्या खून केले जातात आणि खुण्यांना राजाश्रय मिळतोय असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवणार दोन पाणी पत्र संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांना दिले असून ते पत्र संजय राऊत यांनी लिहीले आहे. त्याबाबतच ट्विट त्यांनी केले आहे.

sanjay raut letter
महाराष्ट्रात काय सुरू आहे ?

रिफायनरी आणणारच विधान : 4 फेब्रुवारीला भराडी देवीची यात्रा झाली. या वेळी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेदरम्यान रत्नागिरीत रिफायनरी आपण आणणारच. कोण अडवते ते पाहू असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत केले. या वक्तव्यानंतर रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत वारीशे यांची हत्या करण्यात आली. हा योगायोग समजावा काय? असा सवाल संजय राऊत यांनी या पत्रातून विचारला आहे. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर रत्नागिरीचे पालकमंत्री रिफायनरी होण्यासाठी स्थानिक नागरिकांना थेट धमक्या देत आहेत.

sanjay raut letter
संजय राऊतांचे फडवणीस यांना पत्र

रत्नागिरीतील पत्रकाराची हत्या : रिफायनरी होण्यासाठी स्थानिक पोलीस आणि जिल्हाधिकारींचा देखील वापर होत आहे. पत्रकार वारीशे यांच्यावरही पोलीस यंत्रणेचा दबाव होता. रिफायनरीविरोधात काम केल्यास त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आंगणेवाडी येथील झालेल्या सभेनंतर स्थानिक गुंडांना हिरवा कंदीलच मिळाला असल्याचा ठपका संजय राऊत यांनी पत्रातून ठेवला आहे. कोकणात याआधी श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, यांच्या राजकीय हत्या झाल्या आहेत. यामध्येही राजकीय दबावामुळे आरोपी मोकाट आहेत. पत्रकार वारीचे यांच्या हत्येचा निषेध मुंबईपासून दिल्लीपर्यंत सर्वच पत्रकारांनी केला आहे.

sanjay raut letter
संजय राऊतांचे फडवणीस यांना पत्र

राजकीय दबावापोटी दाबले : पत्रकाराच्या हत्येचे हे प्रकरण राजकीय दबावापोटी दाबले जाण्याची भीती आहे. त्यामुळेच या प्रकरणात समांतर न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी पत्रातून संजय राऊत यांनी केली आहे. तसेच हत्या करण्यात आलेल्या पत्रकार शशिकांत वारीचे यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयाची शासनाने मदत करावी अशी मागणी ही या पत्रातून करण्यात आली आहे. पत्रकार शशिकांत वारीचे हत्या प्रकरण अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आपल्याला सूचना केल्या आहेत. त्याप्रमाणे आपण लवकरच रत्नागिरीला जाणार असल्यासही या पत्रातून संजय राऊत यांनी सांगितला आहे.

हेही वाचा :Sharad Pawar : राज्यात पत्रकारांचीच हत्या होत असेल तर परिस्थिती चिंताजनक -पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.