ETV Bharat / state

Threat to Sanjay Raut: राऊतांना धमकीचा फोन! म्हणाले, तुमचाही शशिकांत वारिसे करू - Sanjay Raut received threat call

काही दिवसांपुर्वी पत्रकार शशिकांत वारिसे यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, वारिसे यांचा हा अपघात नसून ही हत्या आहे असा थेट आरोप केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाला आता वेगळे वळन दिले आहे. तसेच, आज सकाळी आम्ही या घटनेवर आवाज उठवण्यासाठी कोकणात जात आहोत हे सांगताना आपल्यालाही या प्रकरणात पडाल तर आपलाही वारिसे करू अशी फोनवरून दोनदा धमकी आली असा खळबळजनक दावा राऊत यांनी केला आहे.

Threat to Sanjay Raut
Threat to Sanjay Raut
author img

By

Published : Feb 11, 2023, 11:52 AM IST

Updated : Feb 11, 2023, 1:49 PM IST

मुंबई : रत्नागिरीतील पत्रकार शशिकांत शंकर वारिसे यांचा नुकाताच अपघाती मृत्यू झाला आहे. मात्र, नंतर या अपघाताचा वेगळे वळण लागले आहे. हा अपघात नसून ही हत्या आहे असा थेट आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह काही राजकीय नेते आणि संघटनांनी आरोप केला आहे. दरम्यान, राऊत यांनी आज राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत 'राज्यात काय सुरू आहे?' असा थेट प्रश्न विचारला आहे. तसेच, आम्ही कोकणात जाऊन या घटनेविरुद्ध आवाज उठवणार आहोत. मात्र, तुम्ही या प्रकरणात पडलात तर तुमचाही वारिसे करू अशी मला दोनदा धमकी आली असा खळबळजनक दावा राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे.

तुमचाही शशिकांत वारिसे करू

हा अपघात नसून दिवसा-ढवळ्या हत्या : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीसे हे सोमवारी कोदवली येथून आपल्या दुचाकीने जात होते. यावेळी पंढरीनाथ आंबेरकर यांच्या थार गाडीने वारिसे यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या या अपघाताला धरून अनक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, आता संजय राऊत यांनी हा अपघात नसून दिवसा-ढवळ्या हत्या केली आहे असा आरोप केला आहे.

Threat to Sanjay Raut
Threat to Sanjay Raut

मला घाबरवण्याचा प्रयत्न केला : संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेकेड लक्ष वेधले आहे. त्याचवेळी, राऊत म्हणाले, आज सकाळी मलाही दोनदा फोन येऊन गेला की हा मुद्दा तुम्ही उचलू नका. तुमचाही मुंबईत शशिकांत वारीशे करु अशी धमकी दिली आहे. मात्र, अशा धमक्यांना मी घाबरत नाही. मला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तरीही मी कोकणात जाणार आहे असही राऊत यावेळी म्हणाले आहेत.

Threat to Sanjay Raut
Threat to Sanjay Raut

अनेक ठिकाणी निदर्शने : रत्नागिरी जिल्ह्यात एका वृत्तपत्राचे पत्रकार शशिकांत वारिशे यांचा 7 फेब्रुवारी रोजी अपघाती मृत्यू झाला. 6 फेब्रुवारी रोजी हा अपघात झाला. यात ते गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. 48 वर्षीय शशिकांत वारिशे हे कोकणातील नाणार रिफायनरीविरोधात सातत्याने बातम्या लिहित होते. म्हणून त्याची हत्या करण्यात आली असा आरोप केला जात आहे. याविरोधात अनेक निदर्शनेही करण्यात येत आहेत.

फडणवीस यांनाही पत्र : गृहमंत्री महाराष्ट्रात हे काय सुरू आहे? असा थेट सवाल करणारे पत्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीले. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेकडे गृहमंत्र्यांचे आपण लक्ष वळवू इच्छित आहोत. प्रशासनाचा चांगला अनुभव देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. गृहखाते देखील त्यांनी याआधी सांभाळले आहे. तरी देखील राज्यात दिवसाढवळ्या खून केले जातात आणि खुण्यांना राजाश्रय मिळतोय असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर बोट ठेवणारs दोन पाणी पत्र संजय राऊत यांनी गृहमंत्र्यांना दिले असून ते पत्र संजय राऊत यांनी लिहीले आहे. त्याबाबतच ट्विट त्यांनी केले आहे.

हेही वाचा : Sanjay Raut Letter To Fadnavis: महाराष्ट्रात काय सुरू आहे? राऊतांचे फडणवीसांना पत्र

Last Updated : Feb 11, 2023, 1:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.