ETV Bharat / state

संजय राऊतांना कायदा, व्यवस्था, नियम कशाचेही ज्ञान नाही; प्रवीण दरेकरांची टीका - प्रवीण दरेकर

Pravin Darekar On Sanjay Raut: भाजपातर्फे डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ अशी संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेमध्ये केंद्रीय मंत्रीसुद्धा सहभागी होणार असल्याचं भाजप नेते, आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे. (Pravin Darekar Criticized Sanjay Raut) याप्रसंगी त्यांनी उबाठा खासदार संजय राऊत यांच्यावर हल्ला करताना म्हटलं की, संजय राऊत यांना कायदा, व्यवस्था आणि नियम यापैकी कशाचेही ज्ञान नाही.

Prain Darekar On Sanjay Raut
प्रवीण दरेकरांची टीका
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 9:55 PM IST

मुंबई Pravin Darekar On Sanjay Raut : मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता याच्या पॅरोल संदर्भामध्ये संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, पॅरोलवर कैद्याच्या सुटकेचा आदेश हे न्यायालय देत असतं, गृहमंत्री नाहीत. (BJP MLA Praveen Darekar) संजय राऊत यांना कायदा, व्यवस्था आणि नियम कशाचेही ज्ञान नाही; मात्र माध्यमांना ते समजते. सामान्य माणसांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या सुजित पाटकर सोबतचा तुमचा फोटो पण दाखवा. तसेच संजय राऊत यांनी स्वप्ना पाटकर यांना केलेली शिवीगाळ हेसुद्धा सर्वांना माहीत आहे. (Shiv Sena MP Sanjay Raut)

संजय राऊतांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका: भाजप हा लक्ष्य ठरवून काम करणारा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले तर लक्ष्य ठेवून काम करावं लागणार आहे. संजय राऊत यांनी कायदा समजून घ्यायची आवश्यकता आहे. त्यांचं बेताल बोलणं हे सुरूचं आहे. त्याकडे लक्ष देऊ नये असेही दरेकर बोलले.

भाजपा जबाबदार आहे का? मराठा नेते मनोज जरांगे पाटील २० जानेवारी पासून मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्या विषयावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, जरांगे पाटील असं काही जाणीवपूर्वक करतील असं मला वाटत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची स्पष्ट भूमिका आहे. यासाठी राज्यात स्फोटक वातावरण व्हावं असं त्यांना कदापि वाटत नसावं. तसेच काँग्रेस आमदार, माजी मंत्री, सुनिल केदार यांची आमदारकी रद्द झाल्या प्रकरणावर बोलताना दरेकर म्हणाले की, सुनील केदार यांनी ज्या गोष्टी केल्या त्याला भाजपा जबाबदार आहे का? न्यायालय भाजपावर चालतं का? घोटाळा हा घोटाळा आहे. कोर्टानं निर्णय दिला आहे. त्यामुळे लोकशाहीत काही नसताना उगाच कोणी कारवाई करत नाही.

केंद्रातील योजना जनतेपर्यंत नेणार: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील ९ वर्षांत घेतलेले लोकहिताचे निर्णय हे विकसित भारत संकल्प यात्रेद्वारे डिसेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत देशभर पसरवले जाणार आहेत. ही यात्रा गावा गावात जाणार असून या यात्रेत केंद्र सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार आहेत. केंद्रातील योजनांच्या लाभापासून जे अजून वंचित राहिले आहेत त्यांना त्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच केंद्रीय मंत्रीसुद्धा विभागवार या यात्रेत सहभागी होणार आहेत.

हेही वाचा:

  1. सलग सुट्ट्यांमुळं साईबाबांची शिर्डी भक्तांनी गेली फुलून; मंदिर रात्रभर राहणार खुले
  2. मराठा आरक्षणाबाबत सरकार पूर्ण शक्तीनिशी काम करत आहे, जरांगे पाटलांना समजावले जाईल - देवेंद्र फडणवीस
  3. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; स्वीय सहाय्यक जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.