मुंबई : दोन हजार रुपयांची नोट चलनमधून वळगण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यावर शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे. कर्नाटकमधील पराभवाची चर्चा कमी होण्यासाठी दोन हजार रुपयांची नोटबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. या निर्णयावरुन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लहरी राजा म्हटले आहे. पंतप्रधान मोदी हे लहरी राजा आहेत, जे असे नोटबंदीसारखे निर्णय घेत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
लहरीपणा घेतला निर्णय : मोदींच्या विरोधात कोणता निकाल गेला, किंवा वातावरण त्यांच्याविरोधात झाले तर त्यावर पाणी टाकण्यासाठी उलटसुलट निर्णय घेतले जातात हा इतिहास आहे,असे राऊत म्हणाले आहेत. दोन हजार रुपयांची नोट रद्द करायची आहे, यावर चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु त्यावर चर्चा न करता हा निर्णय एका झटक्यात घेण्यात आला. हे लहरीपणा झाले आहे, यामुळे देशाला लहरी राजा मिळाला आहे. तो लहरी राजा असेच निर्णय घेत राहील, असे आपण 2024 पर्यंत गृहीत पकडले पाहिजे.
हिंदुत्ववादी आणि श्रद्धाळू राज्याने भाजपचा पराभव केला : कर्नाटकातील निकाल हा देशाची कल आणि मानसिकता दाखवणारा आहे. या राज्यात भाजपला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. परंतु भाजप हे सत्य स्विकारु पाहत नाही. दरम्यान या राज्यात भाजपने हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक धर्मावर आणू पाहिली होती. पण भाजपचे हे प्रयत्न अपयशी ठरले. यावरुन बोलताना संजय राऊत म्हणाले की, दक्षिणेतील राज्यांमधून कर्नाटक हे महत्त्वाचे राज्य आहे. कर्नाटकात सर्वाधिक हिंदूचे सण आणि उत्सव साजरा केले जातात. तरीही हिंदुत्ववादी राज्याने भाजपचा पराभव केला. या राज्याने नरेंद्र मोदी अमित शहा आणि भाजपचा मोठा पराभव केला. पण हे सत्य भाजप स्वीकारत नाही. सत्य स्वीकारायला शिका, अशा प्रकारचे पराभव नेहमी तुमच्या वाटेला येणार आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.
महापालिकेच्या निवडणुकीची हिंमत का दाखवत नाही? : महापालिकेच्या निवडणुकीवरुनही संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. भाजप महापालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी का टाळाटाळ करत आहे? मुंबई, ठाण्यासह 14 महापालिकेच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवत नसल्याची टीका देखील संजय राऊत यांनी केली. या निवडणुकीत कोणालाही येऊ द्या. कुणालाही प्रचार करू द्या. परंतु पालिकेच्या परिसरात तंबू जरी लावा. पण निवडणुका घ्या. त्यानंतर आम्ही दाखवू की जनमत कुणाच्या बाजूने आहे आणि कुणाला जागा मिळतात.
भ्रष्टचार पंतप्रधानांचे पाया पडले जेम्स मार्पे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पापुआ न्यू गिनी येथे गेले आहेत. तेथील पंतप्रधान जेम्स मार्पे यांनी पंतप्रधान मोदींच्या पायाला स्पर्श केला. त्यावरुनही संजय राऊत यांनी टीका केली आहे. मार्फे यांनी चरण स्पर्श केला की गुडघा स्पर्श केला असा प्रश्न करत राऊत म्हणाले की, पंतप्रधान आमच्या समोर आले तर आम्ही सुद्धा वाकून नमस्कार करु. कारण ते वयाने मोठे आहेत. तर मार्फे हे 60 लाख लोक असलेल्या देशाचे पंतप्रधान आहेत. शिवाय त्यांचा जगाशी काही संबंध नाही. तो भाग अशिक्षित आहे.
हेही वाचा -