मुंबई Sanjay Raut On Deepak Kesarkar : दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर ठाकरे गट घेणार की, शिंदेंची शिवसेना यावर राजकारण तापलं आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ता दीपक केसरकर (Deepak Kesarkar On Dasara Melava) यांनी दसरा मेळावा ओव्हल मैदानावर (Oval Ground) होणार असल्याचं स्पष्ट केलंय. मात्र दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दीपक केसरकर यांच्या विरोधात खळबळजनक दावा करत केसरकर यांना डोमकावळ्याची उपमा (Sanjay Raut Criticized On Deepak Kesarkar) दिली आहे.
'शिवसेना' कोणाची : दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर तोफ डागली आहे. मुंबई महापालिकेकडे दसरा मेळाव्यासाठी कुणी आपणच शिवसेना म्हणून जर अर्ज करत असेल तर त्यांनी स्वतः आरशात बघावं. स्वतःच्या मनाला विचारावं खरच आपण शिवसेना आहोत का, दिल्लीच्या भाजपाच्या नादाला लागून लफंगेगिरी करत आहात. 'शिवसेना' उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे हे जनतेला माहिती आहे. जगाच्या पाठीवर कुठेही जा शिवसेना कोणाची तर लगेच सांगतील ठाकरेंची. तसंच लोक शिंदे कोण आहेत असा देखील प्रश्न विचारतील. शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. तुम्ही अर्ज पहिला केला हे कसले धोरण आहे. राज्यातील जनता डोळ्यावर पट्टी बांधून बसलेली नाहीये, बघूया तुम्ही काय करताय. आमची देखील तयारी असल्याचा इशारा संजय राऊत यांनी शिंदे गटाला दिला आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पाठीत खंजीर खुपसणार : दसरा मेळाव्याच्या माध्यमातून जनतेची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटावर केला होताय. केसरकर यांनी असा आरोप केला आहे. याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, कोण केसरकर, दीपक केसरकर यांचा शिवसेनेशी काय संबंध, हा मोती तलावावरचा डोमकावळा सावंतवाडीचा आहे. त्याचा शिवसेनेचा काय संबंध? ना इकडल्या शिवसेनेशी ना तिकडल्या शिवसेनेशी काय संबंध. पदासाठी आणि सत्तेसाठी हा माणूस आला आहे. त्यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रीपद दिले त्याला आमच्या सर्वांचा विरोध होता. एवढच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या पाठीत एक दिवस खंजीर खुपसून दीपक केसरकर भाजपात जातील असा खळबळ जनक दावाही राऊत यांनी केला आहे.
ईडी बाबत सांगू नका : विरोधी पक्षातील लोकांवर 2024 पर्यंत धाडसत्र आणि छापेमारी सुरू असणार आहे. महाराष्ट्रात आम्ही इतक्या तक्रारी ईडीकडे केल्या आहेत. दादा भुसे, राधाकृष्ण विखे पाटील, राहुल कुल, विक्रांत घोटाळा, क्रिस्टल घोटाळा अशा प्रकारच्या अनेक घोटाळ्यांची माहिती आम्ही दिली आहे. मग का तिथे छापेमारी किंवा धाडी पडत नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. देशभरात विरोधी पक्षावर छापेमारी, धाडी पडतात. जे जेलमध्ये असायला हवे ते मात्र मंत्रिमंडळात आहेत. ईडीबाबत मला सांगू नका असंही संजय राऊत म्हणाले.
पक्ष आणि चिन्ह देणे अमित शाह ठरवतात : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना वरून प्रॉमिस केलं होतं की, पक्ष आणि चिन्ह तुम्हाला देऊ. तशाप्रकारे अजित पवारांना देखील प्रॉमिस केलं आहे. पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोग ठरवत नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ठरवतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
हेही वाचा -