ETV Bharat / state

Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळेंना म्हणावं खुशाल कोर्टात जा, मी वकील देतो; संजय राऊतांचा टोला - देवेंद्र फडणवीस

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोमणा मारत लिहिलेल्या संपादकीयमुळे भाजपामध्ये संताप आहे. राज्यात विविध ठिकाणी भाजपाच्या युवा मोर्चाने सामनाच्या प्रतींसह संपादक संजय राऊत यांचे फोटो जाळून संताप व्यक्त केलाय. संजय राऊत मुर्दाबादसह त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या आहेत. कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 'शिल्लक सेना' म्हणत बॅनर लावले. सोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपण सामना विरोधात न्यायालयात जाणार असल्याचं देखील सांगितलं, याला आता खासदार संजय राऊत यांनी सणसणीत उत्तर दिलयं.

MP Sanjay Raut
खासदार संजय राऊत
author img

By

Published : Aug 20, 2023, 1:54 PM IST

Updated : Aug 20, 2023, 3:12 PM IST

खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक सामनाच्या अग्रलेखात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली होता. राऊतांच्या या टीकेनंतर भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. यासंदर्भात मुंबईत आपल्या निवासस्थानी माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, बावनकुळे यांना म्हणावं की, तुम्ही खुशाल कोर्टात जा. तुम्हाला एखादा चांगला वकील मिळत नसेल, तर मी वकील देतो. सध्या बावनकुळेंचं वाचन कमी झाले. त्यांना माझा सल्ला आहे की, वाचाल तर वाचाल. जर उपमुख्यमंत्र्यांना 'उप' म्हटलं तर गैर काय आहे? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जसे जपानला गेले. तसं त्यांनी चीन, लडाखला जावं. तिथली परिस्थीती समजून घ्यावी. फडणवीस यांचं हे डिमोशन आहे, असा राऊत यांनी टोला लगावला.

राहुल गांधी लडाख दौऱ्यावर : राहुल गांधी सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. ते तिथे वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत. या दौऱ्यात त्यांनी चीनने तेथील लोकांच्या जमिनी बळकावल्याचं म्हटलं आहे. याआधीही राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून अनेकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे. पण, आपल्या बचावात सरकारने एक इंचही जमीन गेली नसल्याचा युक्तिवाद केला होता. यावर देखील खासदार संजय राऊत यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले की, आम्हीही काही महिन्यांपुर्वी लडाखला गेलो होतो. राहुल गांधींनी लेह ते लडाखपर्यंत बाईक चालवल्याचंही मी पाहिले आहे. चीन लडाखमध्ये घुसलंय. अनेक गावं, जमिनींवर कब्जा केल्याचा मुद्दा वारंवार समोर आलाय.

भारत मातेवर अन्याय : यावर बोलताना राऊत म्हणाले की, अरुणाचलच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारानेही सांगितलंय की, चीनने कब्जा केला आहे. चीनने लडाखवर ताबा मिळवल्याचे पुरावेही समोर आले आहेत. पण, आपले संरक्षणमंत्री, पंतप्रधान म्हणणे ऐकून घ्यायला तयार नाहीत. हा एक प्रकारे भारत मातेवर अन्याय आहे. हाच मुद्दा आम्ही अधिवेशनात देखील उपस्थित केला होता. पण, नेहमीप्रमाणे सरकारने यावर चर्चा टाळली.

हेही वाचा :

  1. Sanjay Raut Criticized BJP : तुमच्या पक्षश्रेष्ठींनी युती तोडली, भाजपाचं दुकान डुप्लिकेट - संजय राऊत यांचा घणाघात
  2. Sanjay Raut on Sharad Pawar Photo : गुरुदैवताच्या पाठीत खंजीर खुपसता आणि त्यांचाच फोटो लावता; संजय राऊतांनी फटकारले
  3. Sanjay Raut News: अजित पवारांच्या 'त्या' ऑफरवर संजय राऊत यांचे 'रोखठोक'...

Last Updated : Aug 20, 2023, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.