ETV Bharat / state

Sanjay Raut on Govt : पंतप्रधान मोदींकडून प्रकल्पांचे उद्घाटन; संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र

author img

By

Published : Jan 18, 2023, 2:54 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये विविध विकास प्रकल्पांच्या कामाच्या उद्घाटनासाठी येत आहेत या संदर्भात संजय राऊत यांनी पंतप्रधानांचे स्वागत करीत शिवसेनेने केलेल्या कामांची शिवसेनेने केलेल्या कामांच्या पायाभरणीचे उद्घाटनच ते करत आहेत. एक प्रकारे शिवसेनेच्या कामांवर शिक्कामोर्तब केल्यासारखेच आहे. म्हणत त्यांनी एकाच वेळेला पंतप्रधानांचे स्वागतही केले मात्र दुसरीकडे शासनावर टीका देखील केली.

Sanjay Raut on Govt
पंतप्रधान मोदींकडून प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधान मोदींकडून प्रकल्पांचे उद्घाटन

मुंबई : राज्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले गेले. विशेषकरून मुंबईमध्ये देखील अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी शिवसेनेने केली. त्याच केलेल्या कामांचे आता भूमिपूजन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी करायला येत आहेत. हे म्हणजे शिवसेनेने त्यावेळेला केलेल्या कामांवर एक प्रकारे शिक्कामोर्तब केल्यासारखेच आहे." असे संजय राऊत म्हणाले.

88 कोटीच्या विटा जरी रचल्या गेल्या तरी धन्य : संजय राऊत यांनी पुढे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री यांच्या दावोस दौरा याच्यावर देखील जोरदार टीका केली. त्यांनी सांगितले की," या ठिकाणी जगभरातून सगळे उद्योजक येतात. दरवर्षी आर्थिक उलाढाली त्या ठिकाणी होतात. मात्र आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये 88 कोटीच्या विटा जरी रचल्या तरी धन्य झाले; असे समजू अशी खोचक टीका देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्या संदर्भात केली.

बाळासाहेबांच्या तैलचित्रा संदर्भात उद्धव ठाकरेंना आमंत्रण : बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राच्या उद्घाटनाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांना अद्यापही आमंत्रण दिले गेले नाही. या संदर्भात देखील प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राऊत ताडकन उत्तरले," आम्ही तर सावरकर यांच्यातील चित्राच्या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या नातेवाईकांना आमंत्रित केले होते. सन्मानाने आमंत्रित केले होते. उद्धव ठाकरे यांना बोलवणे ही राज्य शिष्टाचारामधली एक बाब असते. त्यामुळे ही संस्कृती आणि राजशिष्टाचार त्यांना जपावाच लागणार आहे." असे संजय राऊत म्हणाले.

पांढऱ्या कपड्यातील देवदूत : "कोरोना काळामध्ये डॉक्टरांनी तर देवदूत प्रमाणेच काम केलेला आहे मला हे म्हणायचे होते की त्या वेळेला डॉक्टरांचा तुटवडा होता. कोरोना काळामध्ये महाराष्ट्र शासनाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आणि विशेष करून मुंबई महानगरपालिकेने देखील एक चांगल्या प्रकारे काम केले. त्यावेळेला डॉक्टरांचा तुटवडा पडत होता. "त्यामुळे डॉक्टरांच्या संदर्भात मला तसे बिलकुल म्हणायचे नव्हते की ज्या शब्दावरून गदारोळ झालेला आहे. मला हेच म्हणायचे होते की डॉक्टरांचा त्यावेळेला तुटवडा होता आणि डॉक्टरांनी पांढरा कपड्यातील देवदूत असं म्हणून त्यांनी त्यावेळेला लाख मोलाचे काम केले;" असे म्हणत संजय राऊत यांनी डॉक्टरांच्या संदर्भात चुकून निघालेल्या शब्दावर पडदा टाकला.

हेही वाचा : Sanjay Raut bail update : संजय राऊत यांच्या जामीन रद्दच्या याचिकेवर तारीख पे तारीख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.